आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यवतमाळ - येथील पोस्टल ग्राउंडवर ११ जानेवारीला सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली. साहित्य रसिकांची आणि ग्रंथ वाचकांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. 
 
ज्येष्ठ कवयित्री, ललित लेखिका व समीक्षक डॉ. अरुणा ढेरे या ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिथी, तर मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे विशेष अतिथी म्हणून उद्््घाटन समारंभाला उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे ९१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. ११ ते १३ जानेवारी हे तीन दिवस पोस्टल ग्राउंडवर (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, भाऊसाहेब पाटणकर परीसर) व बचत भवन (डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह) येथे होणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, कवीकट्टा चर्चासत्र, परीसंवाद, वऱ्हाडी कवितांचे वाचन, महाराष्ट्राचे काव्यवैभव असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. संमेलनासाठी सर्व रसिकांना प्रवेश राहील. संमेलन काळात प्रतिनिधींच्या सोईसाठी ठराविक ठिकाणी स्कूलबस व ऑटोरिक्षा उपलब्ध राहतील. संमेलनस्थळी महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील नामांकित प्रकाशकांचे ग्रंथ, सीडी, शब्दकोश, विश्वकोश, असे साहित्य उपलब्ध राहणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...