आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी विधानसभेची : शिवसेना-भाजपला प्रत्येकी १३५, अन्य मित्रपक्षांना केवळ १८ जागा, भाजप नेते चंद्रकांत पाटलांंनी सांगितला जागावाटपाचा फाॅर्म्युला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लाेकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असून हे दाेन्ही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी १३५ जागा लढवतील. तर रासप, शिवसंग्राम, रिपाइं आदी छाेट्या मित्रपक्षांना १८ जागा साेडण्यात येतील. महायुतीचा राज्यातील २८८ जागांच्या वाटपाचा असा फाॅर्म्युला असेल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत दिली. दुष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री पाटील रविवारी औरंगाबादेत आले हाेते. शासकीय बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘लाेकसभा निवडणुका आटाेपताच आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेत काही कारणामुळे वाद हाेते. शिवसेनेेने १५१ जागांचा आग्रह धरल्यामुळे तेव्हा विधानसभा निवडणुकीची आधी आमची युती तुटली हाेती. मात्र आता वाद मिटला असून आम्ही लाेकसभा निवडणुका एकत्र लढवल्या, राज्यात चांगले यशही मिळवले. आता विधानसभेचीही निवडणूक एकत्रच लढवू. जागावाटपाबाबत लवकरच दाेन्ही पक्षांची चर्चा हाेईल.’

 

‘खैरे भाजपमुळे नव्हे, शिवसेनेच्या माजी आमदारामुळेच पडले’
औरंगाबादेतून २० वर्षे खासदार राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी निकालापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अपयशाचे खापर फाेडले हाेते. दानवेंनी जावयाला मदत केल्यामुळेच खैरेंचा पराभव झाला, अशी चर्चा अजूनही सुरू आहे. त्याचे खंडन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘खैरेंचा पराभव भाजपमुळे नव्हे तर शिवसेनेच्या एका माजी आमदारामुळेच झाला आहे,’ असे सांगत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला.