आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात मोठ्या विमानतळाच्या तयारीला सुरूवात, 2023 मध्ये होणार पहिले उड्डाण; 15 हजार 754 कोटी रूपये खर्च येणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे काम पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. या विमानतळावरून पहिले उड्डान 2023 मध्ये सुरू होईल. तसेच, पहिल्या टप्प्यात दोन धावपट्ट्या तयार केल्या जाणार असून उर्वरित चार धावपट्ट्यांचे काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. यासाठी सुमारे १५ हजार ७५४ कोटी रूपयांचा खर्च केला जाईल. त्यामुळे हे देशातील सर्वात आधुनिक विमानतळ ठरणार आहे. तज्ञांच्या मते, यामुळे भारतीय विमानतळांना लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या विमानतळांची बरोबरी करता येईल. 

 

50 लाख प्रवासी येण्याची अपेक्षा
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनी लिमिटेड (निआल) ने शुक्रवारी देशातील प्रस्थापित सर्वात मोठे असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळचा लिलाव जाहिर केला. त्यामुळे निवडप्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तसेच, या विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षी ५० लाख प्रवासी येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

 

सहा धावपट्ट्यांची मान्यता
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड जेवरचे सीईओ अरुणवीर सिंह यांनी बुधवारी या कामाचे ग्लोबल टेंडर जारी केले. त्यांनी सांगितले की, या विमानतळाला सहा धावपट्ट्यांचे बनवण्यासाठी उत्तरप्रदेश मंत्रीमंडळाकडून मान्यता मिळाली आहे. सुरूवातीला दोन धावपट्ट्यांची मान्यता मिळाली होती. पण, या नवीन मान्यतेमुळे हे देशातील सर्वात मोठे विमानतळ होणार आहे. सध्या सहा लेनपेक्षा जास्त असणारे विमानतळ जगातील काही देशांमध्येच आहे.

 

चार टप्प्यात पूर्ण होणार विमानतळ 
माहितीनुसार, या विमानळाचे चार टप्प्यात काम होणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात 4086 कोटी रूपये खर्च करून 2023 पर्यंत दोन धावपट्ट्यांचे विमानतळ तयार केले जाईल. त्यानंतर, 2030 पर्यंत दूसरा, 2035 पर्यंत तीसरा आणि 2039 पर्यंत चौथा टप्पा पूर्ण होईल.

बातम्या आणखी आहेत...