• Home
  • News
  • Preparations for Isha Ambani's Pre Wedding Ceremony

अंबानी कुटुंबातील लग्न / अंबानी कुटुंबातील लग्न / उदयपूरच्या पिछोला तलावाच्या किना-यावर तयार करण्यात आली श्रीनाथजींची 35 फूट उंच मुर्ती

सुरक्षेसाठी इस्राइल आणि लंडनच्या कंपन्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 07,2018 11:31:00 AM IST

उदयपूरः ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेरेमनीसाठी हॉटेल ओबरॉय उदय विलासच्या पिछोला तलावाच्या किना-यावर श्रीनाथजींची 35 फूट उंच प्रतिमा तयार करण्यात आली. महाआरतीसाठी पिछोला तलावाला हरिद्वार घाटाचे रुप देण्यात आले आहे.

ईशाचा भावी आनंद त्याचे वडील अजय पीरामल आणि आई स्वाती पीरामल यांच्यासोबत उदयपूर येथे पोहोचला आहे. शहरातील 7 प्रमुख हॉटेल उदयविलास, लेक पॅलेस, लीला, रेडिसन ब्लू, रमाडा, ट्राइडेंट आणि ललित लक्ष्मी विलाससह अन्य हॉटेलच्या 2000 हून अधिक रुम बुक करण्यात आल्या आहेत. हॉटेलमध्ये कच्छी घोडी आणि कालबेलिया डान्सर पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत. सुरक्षेसाठी इस्राइल आणि लंडनच्या कंपन्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तयारी करत असलेल्या कर्मचारी आणि अधिका-यांना विशेष बार कोड असलेले आयडी कार्ड देण्यात आले आहेत.

टाटाच्या एअरलाइन्स कंपनीने ट्वीट करुन दिली स्पेशल फाइटची माहिती...

टाटा समूहच्या विस्तारा या एअरलाइन्स कंपनीने चार दिवसांसाठी उदयपूर येथे स्पेशल फ्लाइट सर्व्हिस सुरु केली आहे. विस्ताराने ट्वीट करुन सांगितले की, एअरलाइन्स कंपनी 7, 8, 9 आणि 10 डिसेंबर रोजी दिल्ली-मुंबई-उदयपूरसाठी विशेष सेवा देत आहे. 7 डिसेंबर रोजी उदयपूरहून दिल्लीसाठी एक फ्लाइट, 8 डिसेंबर रोजी तीन फ्लाइट, 9 डिसेंबर रोजी दिल्लीहून उदयपूरसाठी एक फ्लाइट आणि 10 डिसेंबर रोजी दिल्लीहून उदयपूरसाठी उड्डान घेणार आहे. सर्व फ्लाइट्सचे बुकिंग सुरु झाले आहे. यासोबतच विस्ताराचे काही चार्टरही येथे येत आहेत. या फ्लाइट्समध्ये बॉलिवूड सेलेब्स आणि व्हीव्हीआयपी येण्याची शक्यता आहे.

तोफांमधून होणार फुलांचा वर्षाव...

अंबानी कुटुंबीय ईशाच्या प्री वेडिंग सेरेमनीत तोफांमधून फुलांचा वर्षाव करणार आहेत. यासाठी देश-विदेशातून फुले मागवण्यात आली आहेत. परफॉर्म करणारे क्रू मेंबर्सनी गुरुवारी ट्राइडेंट आणि ओबरॉय हॉटेल, उदय विलास हॉटेलमध्ये सराव केला.


मुकेश अंबानींनी बघितली तयारी..
तयारी बघण्यासाठी स्वतः मुकेश अंबानी हॉटेलमध्ये पोहोचले होते. येथे उपस्थितांनी सांगितल्यानुसार, मुकेश अंबानी बराच वेळ हॉटेलमध्ये थांबले होते. ते 4:30 वाजता नीता अंबानींसोबत दिल्लीत गेले आणि तेथील खास लोकांना आमंत्रित करु रात्री 9.30 वाजता उदयपूरला परतले.


उदयविलासमध्ये ट्रायल
हॉटेल ओबरॉय उदयविलास आणि ट्राइडेंटमध्ये इव्हेंट कंपन्यांनी दिवसभर तयारी केली. ट्राइडेंट हॉटेलच्या परिसरातील भींतींवर चारही दिशांनी मोठ्या संख्येने लेजर लाइट लावण्यात आले. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास दोन्ही हॉटेलमध्ये राजस्थानी गीत लावण्यात आले. मंगणियार आणि स्थानिक कलाकारांनीही यावेळी सराव केला.

सेलिब्रिटी मेंदी आर्टिस्ट वीणा नागदा ईशा अंबानीच्या हातांवर मेंदी लावणार आहे. वीणा यांनीच सोनम कपूरच्या लग्नात तिला मेंदी लावली होती. याशिवाय आकाश अंबानीची भावी पत्नी श्लोका मेहतालाही तिच्या साखरपुड्याला मेंदी लावली होती.

X
COMMENT