आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींच्या लेकीचे लग्न : मार्केटप्लेस ते लाइट शो, उदयपूरमध्ये अशी सुरू आहे ईशा-आनंदच्या प्री-वेडिंग सेरेमनीची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - बिझनेसमन मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे 12 डिसेंबरला मुंबईत लग्न होत आहे. त्यापूर्वी लेक सिटी उदयपूरमध्ये 8-9 डिसेंबरला त्यांची प्री-वेडिंग सेरेमनी होत आहे. हॉटेल उदय विलासमध्ये होणाऱ्या या ग्रँड सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू आहे. बुधवारपासूनच व्हीव्हीआयपी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. 8 डिसेंबरला अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन येणार आहे. त्यांचे पती आणि माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनही सोहळ्याला येऊ शकतात. यापूर्वी अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेच्या गार्ड्सने उदयपूर जिल्हा पोलिसांसह सोहळ्याच्या ठिकाणांचा आढावा घेतला. मुकेश अंबानीही कुटुंब आणि नातेवाईकांसह उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. 8 डिसेंबरला महाआरतीने ग्रँड सेरेमनीला सुरुवात होईल. जाणून घेऊयात या दोन दिवसांत काय खास होणार आहे. 


8 डिसेंबर पहिला दिवस 
- वेबसाइट डीएनएच्या रिपोर्टनुसार, शनिवारी लेक पिचोला येथील हॉटेल ओबेरॉय उदयविलासच्या लॉनला मार्केटप्लेसचे रुप दिले जाणार आहे. 
- येथे जवळपास 150 स्टॉल्स लावले जातील. त्यात काही जुन्या आणि प्रतिभासंपन्न कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या काही खास कलाकृतींचे प्रदर्शन केले जाईल. 


9 डिसेंबर दुसरा दिवस 
- दुसऱ्या दिवशी रविवारी उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये कार्यक्रम होईल. पॅलेसच्या आत असलेल्या मानक चौकात कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले जात आहे. 
- रिपोर्टनुसार येथे साऊंड अँड लाइट शोची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी याठिकाणी आधीच एक स्टेज तयार करण्यात येत आहे. 

 

पिंजऱ्यात कबूतरही आणले 
- बुधवारी डबोक एअरपोर्टवर 5 चार्टर विमाने आली. त्यात अंबानी कुटुंबासह लग्नाचे काही सामानही आणण्यात आले. 
- लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या अंबानी कुटुंबाच्या सदस्यांच्या सामानासह तीन पिंजरेही होते. त्यात कबूतर दिसत होते. 

बातम्या आणखी आहेत...