आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आटपाडी कारागृहाचे होणार ऐतिहासिक वारशात रूपांतर, 'दाे आँखे बारह हाथ' चित्रपटाचे १९५७ मध्ये झाले हाेते चित्रीकरण

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील कारागृहांत गायले जाते चित्रपटाचे गाणे

मंगेश फल्ले 

पुणे/सांगली- दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाे अाँखे बारह हाथ' चित्रपटाने अनेक राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले. या चित्रपटातील काही दृश्ये सांगली परिसरातील अाटपाडी कारागृहात चित्रीत करण्यात अाली हाेती, मात्र काळाच्या अाेघात कारागृह नामशेष हाेण्याचे मार्गावर येऊन ठेपले असताना राज्य कारागृह विभागाकडून अाटपाडी कारागृहाचे ऐतिहासिक वारशात रूपांतर करून त्याचे जतन केले जावे याकरिता राज्य कारागृह विभाग प्रशासनाकडून सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र देण्यात अाले अाहे.राज्य सरकारतर्फे अाटपाडी खुल्या कारागृहाच्या जवळच नवीन कारागृह इमारतीचे बांधकाम करण्यात अाले असून जुन्या कारागृहातील कैदी त्या ठिकाणी हलवण्यात अाले अाहेत. या कारागृहाची बांधणी १९३८-३९ मध्ये करण्यात अालेली असून त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला अाहे. यामध्ये दगड, माती अाणि लाकडाच्या साहाय्याने ३० खाेल्या बांधण्यात अाल्या असून त्यापैकी २८ खाेल्या कैदी व त्यांच्या कुटुंबाकरिता वापरण्यात येत हाेत्या, तर दाेन खाेल्यांचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी केला जात हाेता. यंदाच्या पावसामुळे या खाेल्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कैद्यांना नवीन कारागृहात हलवण्यात अाले अाहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे लेखक ग. दि. माडगूळकर यांनी १९५५च्या दरम्यान दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना पत्र देऊन संबंधित खुल्या कारागृहातील 'स्वातंत्र्यपुरा' परिसरात चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण करावे, असे सुचवले हाेते. त्यानुसार संबंधित कारागृहाची पाहणी करून तेथे शूटिंग करण्याचे निश्चित झाले हाेते. सांगलीच्या राजाने दुष्काळी भाग असलेल्या अाटपाडीला तळे व त्या जवळच ६१ एकर जागेत ही खुली काॅलनी निर्माण केली. स्वातंत्र्यानंतर या काॅलनीच्या देखभालीची जबाबदारी कारागृह प्रशासनावर अाली.

राज्यातील कारागृहांत गायले जाते चित्रपटाचे गाणे
 
राज्य कारागृह विभागाचे अप्पर पाेलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले की, 'दाे अाँखे बारह हाथ' चित्रपटातील 'एे मालिक तेरे बंदे हम..' या गाण्याने सर्वांना ऊर्जा अाणि प्रेरणा मिळत असल्याने हे गाणे राज्यातील सर्व कारागृहांत सकाळच्या प्रार्थनेवेळी गायले जात अाहे. कारागृहातील परिसरात कैद्यांनी चांगले वर्तन करावे या दृष्टीने हे गाणे प्रभावी ठरत अाहे.

'दो आँखे...' चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी
 
१९५४ मध्ये नामदेव अाणि येडा हे दाेन कैदी पसार झालेे, परंतु १५ दिवसांतच ते स्वत:हून कारागृहात परतले हाेते. या कैद्यांनी अाम्ही काेठेही गेलो कारागृह अधीक्षकांचे दाेन डाेळे अामचा पाठलाग करत असल्याचे सांगितले. ही गाेष्ट ग.दि.माडगूळकर यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती व्ही. शांताराम यांना सांगितली व चित्रपटाची निर्मिती झाली.


दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाे अाँखे बारह हाथ' चित्रपटाने अनेक राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले. या चित्रपटातील काही दृश्ये सांगली परिसरातील अाटपाडी कारागृहात चित्रीत करण्यात अाली हाेती, मात्र काळाच्या अाेघात कारागृह नामशेष हाेण्याचे मार्गावर येऊन ठेपले असताना राज्य कारागृह विभागाकडून अाटपाडी कारागृहाचे ऐतिहासिक वारशात रूपांतर करून त्याचे जतन केले जावे याकरिता राज्य कारागृह विभाग प्रशासनाकडून सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र देण्यात अाले अाहे.

राज्य सरकारतर्फे अाटपाडी खुल्या कारागृहाच्या जवळच नवीन कारागृह इमारतीचे बांधकाम करण्यात अाले असून जुन्या कारागृहातील कैदी त्या ठिकाणी हलवण्यात अाले अाहेत. या कारागृहाची बांधणी १९३८-३९ मध्ये करण्यात अालेली असून त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला अाहे. यामध्ये दगड, माती अाणि लाकडाच्या साहाय्याने ३० खाेल्या बांधण्यात अाल्या असून त्यापैकी २८ खाेल्या कैदी व त्यांच्या कुटुंबाकरिता वापरण्यात येत हाेत्या, तर दाेन खाेल्यांचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी केला जात हाेता. यंदाच्या पावसामुळे या खाेल्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कैद्यांना नवीन कारागृहात हलवण्यात अाले अाहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे लेखक ग. दि. माडगूळकर यांनी १९५५च्या दरम्यान दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना पत्र देऊन संबंधित खुल्या कारागृहातील 'स्वातंत्र्यपुरा' परिसरात चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण करावे, असे सुचवले हाेते. त्यानुसार संबंधित कारागृहाची पाहणी करून तेथे शूटिंग करण्याचे निश्चित झाले हाेते. सांगलीच्या राजाने दुष्काळी भाग असलेल्या अाटपाडीला तळे व त्या जवळच ६१ एकर जागेत ही खुली काॅलनी निर्माण केली. स्वातंत्र्यानंतर या काॅलनीच्या देखभालीची जबाबदारी कारागृह प्रशासनावर अाली.

बातम्या आणखी आहेत...