आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक व्यक्ती खासगी कंपनीमध्ये काम करायचा, त्याने एका महात्मला विचारले की, मी खुप अडचणीत आहे, माझ्या अडचणी कशा दूर होऊ शकतात, यावर उपाय सांगा, संत म्हणाले एक रात्र माझ्या उंटांची देखरेख कर, यानंतर काय झाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. एक व्यक्ती प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायचा. तो नेहमी आपल्या आयुष्याला कंटाळलेला असायचा आणि सकाळ-संध्याकाळ त्याच्या अडचणी मोजत राहायचा. एकदा त्याच्या शहरात एक महात्मा आले. हा तरुणही त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला. त्याला संधी मिळताच त्याने महात्माला एक प्रश्न विचारला. तो म्हणाला की, मी खुप अडचणींत आहे, कृपया काही तरी मार्ग सांगा ज्यामुळे माझ्या सर्व अडचणी दूर होऊ शकतील. 


- हा प्रश्न एकून महात्मा हसले आणि म्हणाले, मी तुझ्या अडचणींवरील उपाय उद्या सांगेल. पण एक अट आहे, तुला माझ्या उंटांची रात्रभर देखरेख करावी लागले. ज्यावेळी सर्व उंट बसून जातील तेव्हा तु झोपून जा. 
- तरुणाने महत्माचे ऐकले. यानंतर दूस-या दिवशी महत्माने तरुणास विचारले की, झोप कशी आली. यावर तरुण म्हणाला की, मी रात्रभर झोपू शकलो नाही. एखादा उंट झोपला की, दूसरा उभा राहत होता. यामुळेच मला रात्रभर जागे राहावे लागले. 
- तरुणाचे उत्तर ऐकून महत्मा म्हणाले की, असे होणार हे मला माहिती होती. ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत कधीच सर्व उंट एकाच वेळी बसू शकत नाही. तरुण म्हणाला की, तुम्हाला माहिती होते तर तुम्ही मला हे काम का दिले. 
- व्यक्तीच्या या प्रश्नावर महात्मा म्हणाले की, आयुष्यात समस्या नेहमीच राहतात. एक संपली की दूसरी समस्या निर्माण होते. यामुळे समस्यांमुळे तणाव घेऊ नका. नेहमी हिंमतीने याचा सामना करावा. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...