आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - शहरातील कुसुम सभागृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत तिसऱ्या दिवशी “आणखी एक द्रोणाचार्य” हे सादर करण्यात आले. संकल्प प्रतिष्ठान, नांदेड या संस्थेने सादर केलेल्या या नाटकास रसिक प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
आजच्या काळातील शिक्षकाची तुलना द्रोनाचार्याशी केली आहे. ज्याने अन्याय सहन करण्याची परंपरा जोपासली, पक्षपात, जातीभेद यासाठी इतिहास त्यांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. या नाटकातील मुख्य नायक प्रोफेसर अरविंद ( सुनील देव ) एक आदर्शवादी शिक्षक असतो. पण सत्तेच्या दबावाखाली त्याचे आदर्श, सिद्धांत चिरडले जातात. तो ज्या ज्या वेळेला अन्याय अत्याचाराच्या विरुध्द बंड करण्याचा प्रयत्न करतो. त्या त्या वेळी संपत्ती, सत्ता त्यावर हावी होते. त्याचा मित्र विमलेंदू ( योग पराडकर ) अशाच सिद्धांतामुळे, आदर्शामुळे सत्ताधाऱ्यांचा बळी ठरतो. त्याला आपला स्वतःचा जीव गमवावा लागतो. तो भूत बनून अरविंदला सतत समजावत असतो, की तडजोड कर, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ नकोस. सत्ता आणि संपत्ती या समोर कोणाचाही विजय होत नाही. एक कुत्रा बनून रहा. तो अरविंदची तुलना नेहमी द्रोणाचार्याशी करत आसतो.
या नाटकात तेजस्वी निगवेकर, प्रवीण जाधव, पीयूष बोराडे, विजय कोयंडे, अभिषेक कुलकर्णी, साहिल काकडे, विश्वजित वळंजू, राहुल कांबळे, चेतन मेस्त्री, एकता पाटील, राजिका कानडे यांनी आशयानुरूप अभिनय करण्याचा प्रयत्न केला. या नाटकाचे नेपथ्य प्रसाद मिस्त्री यांनी आशयानुरूप वास्तवाशी जवळीक साधणारे आसे साकारले, आदित्य दरवेश यांची प्रकाश योजना नाटकाची उंची वाढवण्यास मदत करते, यातील वेशभूषा आणि रंगभूषा- सिद्धी मिठ्बावंकर यांनी आशयानुरूप साकारली, तर संगीत- चिन्मय वेद्य, पार्श्वसंगीत संयोजन- किरण घरत यांनी दिले.
भ्रष्टाचार, राजकारणावर हल्ला
शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, जागोजागी चालणारा वशिला, पक्षपात, राजकीय हस्तक्षेप, आर्थिक आणि सामाजिक वाढत चाललेला दबाव या सर्व गोष्टीचा एकत्रित परिणाम आदर्शवादी तत्त्वनिष्ठ शिक्षक केवळ त्यांच्या हातातली बाहुली बनून राहते, हे या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. महाभारतात दिलेले संदर्भ, द्रोणाचार्य व अरविंद यांचा तुलनात्मक मांडलेले आयुष्य दाखवण्यात दिग्दर्शक (सुनील देव) यशस्वी ठरले. आजही हे नाटक आपल्याला भ्रष्ट समाजाचा आरसा दाखवतो आणि सत्य युगातील माणसाला कलियुगात स्थान नाही हे दाखवताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.