ऑस्कर 2020 / 10 वर्षानंतर अकॅडमी अवार्ड्सच्या स्टेजवर दिसला भारत, प्रेझेन्टर - अभिनेता उत्कर्ष अंबुडकरने केले परफॉर्म

ऑस्कर 2020 मध्ये यावेळी ग्रॅमी विनर बिली एलिशनेदेखील केले परफॉर्म

दिव्य मराठी वेब टीम

Feb 10,2020 05:15:00 PM IST

हॉलिवूड डेस्क : 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये सलग 18 व्या वर्षी भारतीय सिनेमाचे हात रिकामेच राहिले. पण, 2009 मध्ये एआर रहमान यांच्या परफॉर्मन्सच्या 10 वर्षानंतर पुन्हा एकदा भारताने अवॉर्ड सेरेमनीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. सेरेमनीच्या दरम्यान भारतीय वंशाचा अभिनेता उत्कर्ष अंबुडकरने परफॉर्म केले. अंबुडकर ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून पोहोचला होता.


अमेरिकन अभिनेता उत्कर्ष अंबुडकर...


36 वर्षीय उत्कर्षने सेरेमनीदरम्यान स्टेजवर पोहोचून फ्रीस्टाइल रॅप केला. भारतीय वंशाचे डॉक्टर सुरेश वी अंबुडकरचा मुलगा उत्कर्ष फ्रीस्टाइल लाइव्ह परफॉर्मन्स ग्रुप (फ्रीस्टाइल लव्ह सुप्रीम) चा सदस्य आहे. तो ‘पिच पर्फेक्ट’, ‘राइड अलॉन्ग 2’ यांसारख्या हिट हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे.


"मला माझ्या नावावर गर्व आहे..."


इंग्रजी वेबसाइट GQ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उत्कर्षला प्रश्न केला गेला की, तू हॉलिवूडची नाव का नाही बदलले ? तर तो म्हणाला की, असे कधीच नाही झाले की, मला माझे नाव बदलावे किंवा छोटे करावे लागेल. मला माझे नाव आणि माता-पित्यावर गर्व आहे आणि जर मी सतत काम करत राहिलो तर लोक मला ओळखायला लागतील.


ग्रॅमी विनर बिली एलिशनेदेखील केले परफॉर्म...


यावेळी ऑस्कर सेरेमनीमध्ये अवॉर्डसाठी नॉमिनेट गाणे परफॉर्म केले गेले. एल्टन जॉनने चित्रपट ‘रॉकेटमन’ चे गाणे आय एम गोना लव्ह मी अगेन यासाठी अवॉर्ड मिळवला. तसेच, 62 व्या ग्रॅमी अवॉर्डमध्ये पाच पुरस्कार आपल्या नावे केलेली बिली एलिशनेदेखील परफॉर्मन्स दिला.

X