US / लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'ती माझ्या टाईपची नाही!'

एका स्टोरच्या ड्रेसिंग रुममध्ये ट्रम्प यांनी शोषण केल्याचा आरोप

वृत्तसंस्था

Jun 25,2019 04:34:19 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या विचित्र निर्णय आणि वक्तव्यांसाठी जगभरात ओळखले जातात. परंतु, शोषणाचे आरोप लावणाऱ्या एका महिलेवर त्यांनी केलेल्या विधानावर सर्वत्र टीका होत आहे. ती महिला आपल्या टाईपची नाही असे ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकन लेखिका ई जीन कॅरल हिने ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार, ट्रम्प यांनी कथितरित्या एका क्लोदिंग स्टोअरच्या चेन्जिंग रुममध्ये तिचे लैंगिक शोषण केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प एक अब्जाधीश उद्योजक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यावर यापूर्वीही एका पॉर्न स्टारसह अनेक महिलांनी शोषणाचे आरोप केले आहेत.


काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी 'द हिल' ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले, की "कॅरल खोटे बोलत आहे. पहिली गोष्ट म्हणजे, ती माझ्या टाईपची नाही. आणि दुसरी म्हणजे असे कधी घडलेच नाही. हे कधीच घडले नाही, ओके?" बलात्काराचे आरोप लावणाऱ्या महिलेला आपण ओळखतही नाही. लोक अशा स्वरुपाची विधाने करत राहतात हे अतिशय भयभीत करणारे आहे.


काय आहेत आरोप?
सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅरल म्हणाली होती, की "ही घटना 1995 च्या अखेरीस किंवा 1996 च्या सुरुवातीला घडली. ट्रम्प त्या ठिकाणी एका महिलेसाठी ड्रेस आणि लॉन्जरी खरेदी करण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी मला एक ड्रेस ट्राय करण्यासाठी दिली होती. या ड्रेससाठी मॉडेल होऊन दाखव असे ट्रम्प गंमतीने म्हणाले होते. त्यावेळी ते मार्ला मेपल्ससोबत विवाहात होते. मी चेन्जिंग रुममध्ये जाताच त्यांनी आत येऊन दार बंद केला. प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत ट्रम्प यांनी मला इतका जोरदार धक्का दिली की मी भिंतीला जाऊन आदळले आणि माझ्या डोक्याला दुखापत झाली. माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला."

ट्रम्प यांच्यावर अत्याचाराचे आरोप लावणारी कॅरल एकटी नाही. यापूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्सने सुद्धा ट्रम्प यांच्यावर आरोप केले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी ट्रम्प यांनी कथितरित्या पैशांची ऑफर केली होती. परंतु, पैसे मिळालेच नाही. यानंतर मागणी केली तेव्हा ट्रम्प यांच्या वकिलांनी धमक्या देण्यास सुरुवात केली असा दावा तिने केला होता. एवढेच नव्हे, तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांची यादीच समोर आली होती. त्यावेळी सुद्धा ट्रम्प यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

X
COMMENT