Home | International | Other Country | President Donald Trump fills wrong colors in flag of United States

राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्याच राष्ट्रध्वजात भरले चुकीचे रंग, लाेकांच्या प्रतिक्रिया- जरा जपून

वृत्तसंस्था | Update - Aug 29, 2018, 09:01 AM IST

अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे अापल्याच देशाच्या राष्ट्रध्वजाचे रंग विसरले. ते शालेय विद्यार्थ्यांना चित्रकला

  • President Donald Trump fills wrong colors in flag of United States

    वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे अापल्याच देशाच्या राष्ट्रध्वजाचे रंग विसरले. ते शालेय विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवण्यास गेले हाेते. तेथे त्यांनी अमेरिकी राष्ट्रध्वजाच्या चित्रात चुकीचे रंग भरून टाकले. हे चित्र सार्वजनिक हाेताच त्यांना नागरिकांनी चांगलेच ट्राेल केले.


    डाेनाल्ड ट्रम्प हे दाेन दिवसांपूर्वी पत्नी मेलेनियासह मुलांच्या रुग्णालयात गेले हाेते. तेथे मुलांसाठी चित्रकलेचा प्रशिक्षण वर्ग सुरू हाेता. राष्ट्रपती ट्रम्प हेदेखील त्यात सहभागी झाले व मुलांसह चित्रात रंग भरू लागले. या वेळी शिक्षकांनी मुलांना अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र काढून ते रंगवण्यास सांगितले. चिमुकल्या मुलांनी देशाच्या झेंड्याचे चित्र बराेबर काढले; परंतु ट्रम्प यांनी त्यात चुकीचे रंग भरले. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजात लाल व पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. साेबतच निळ्या रंगाच्या चाैकटीत ५० तारे असतात; परंतु ट्रम्प यांनी त्या जागी पांढऱ्या, निळ्या व लाल रंगाचे पट्टे बनवले व चाैकटदेखील बनवली नाही. ट्रम्प यांची ही माेठी चूक न पाहता अाराेग्य व मानव सेवामंत्री अॅलेक्स अझहर यांनी ते चित्र तसेच साेशल मीडियावर शेअर करून टाकले. त्यानंतर लगेच नागरिकांनी ट्रम्प यांना ट्राेल करणे सुरू केले. लाेकांनी लिहिले- प्रेसिडेंट साहेब, जरा सांभाळून रंग भरा; अन्यथा रशियाचा ध्वज तयार हाेईल. कारण पांढरा, निळा व लाल रंगाचे पट्टे रशियाच्या झेंड्यातच असतात.

Trending