आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत, संजय राऊतांचा मुनगंटीवारांवर निशाणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा करणे हा निवडणुकीतील जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती राजवटीची धमकी देणे भाजपला शोभत नाही, ती लोकशाहीविरोधी धमकी असल्याचे संजय राऊत म्हणाले. शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
दरम्यान संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने ठरवले तर बहुमत सिद्ध करू शकतो असा इशारा भाजपला दिला होता. यावर शिवसेनेना आणि भाजपने लवकर सरकार स्थापन  न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. दरम्यान मुनगंटीवारांचे त्या विधानाचा विपर्यास करण्यात येऊ नये. युतीचे सरकार यावे ही आमचीही इच्छा असल्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले. 
 
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिले. मात्र सरकारस्थापनेबाबत शिवसेना आणि भाजप यांच्या अद्याप निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरु आहे. दरम्यान भाजप नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहे. 

बातम्या आणखी आहेत...