आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीबीचे डॉ. उगलेंसह शहर पोलिस दलातील तिघांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिस दलात शौर्यपूर्ण, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह शहर पोलिस दलातील बाळू भवर (उपआयुक्त, परिमंडळ १), अरुण आहिरे (अंबड पोलिस ठाणे), अारिफखान पठाण (उपआयुक्त, परिमंडळ २) आणि सुभाष जाधव (नाशिकरोड पोलिस ठाणे) यांचा समावेश आहे. 


स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेल्यांची नावे घाेषीत केली. राज्यात मुंबई शहरानंतर सर्वाधिक पदक नाशिकला प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पदक प्रदान केले जातील.

बातम्या आणखी आहेत...