आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वाॅशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संंबोधित केले. तिसऱ्यांदा ट्रम्प यांनी स्टेट ऑफ युनियनमध्ये मार्गदर्शन केले. या वेळी स्टेट ऑफ द युनियनची थीम ‘इट्स द ग्रेट अमेरिकन कमबॅक!’ म्हणजे अमेरिकेचे महान पुनरागमन होते. या वेळी राष्ट्रपती ट्रम्प आणि कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांच्यात तणाव दिसून आला. ट्रम्प यांच्या भाषणाआधी पोडियमकडे जाताना पॅलोसी यांनी खुर्चीवर उठत अभिवादनासाठी राष्ट्रपतींकडे हात पुढे केला, मात्र ट्रम्प यांनी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेले. पॅलोसी यांनी हा राग ट्रम्प यांच्या भाषणाच्या वेळी काढला. भाषणादरम्यान उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी अनेकदा उभे राहत टाळ्या वाजवल्या तर सभापती नॅन्सी पॅलोसी जागेवर बसून राहिल्या. नंतर ट्रम्प यांचे भाषण संपताच पॅलोसी यांनी सभागृहात सर्वांसमोर त्यांच्या भाषणाची प्रत फाडली.
आखाती, अफगाण युद्ध संपवण्यासाठी काम :
अमेरिकेचे प्रशासन आखाती देश, तसेच अफगाणिस्तानातील युद्ध संपवण्यासाठी काम करत असून अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या जवानांना परत आणण्याचे काम सुरू असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री स्टेट अॉफ द युनियनमध्ये मनोगत व्यक्त करताना साांगितले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अफगाणिस्तानात ज्या प्रकारे आमच्या जवानांनी प्रतिबद्धता आणि शौर्याचे प्रदर्शन केले त्यातून आम्ही अनेक गोष्टी प्राप्त केल्या. तसेच, शांततेसाठी चर्चाही सुरू ठेवली. आता आपण अमेरिकेचे सर्वात दीर्घ युद्धाला संपवण्याच्या दिशेने काम करत आहोत व आपल्या जवानांना परत आणण्याचे काम करत आहोत.
अमेरिकेचेे इराणबरोबरचे संबंध बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणी अर्थव्यवस्था कमी वेळेत सुधारण्यासाठी अमेरिका मदत करू शकतो.
पहिल्या कृष्णवर्णीय पायलटचा सन्मान
ट्रम्प यांनी सुरुवातीला अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय पायलटांपैकी एक असलेले दुसऱ्या महायुद्धात सहभागी शंभर वर्षांचे चार्ल्स मॅक्गी यांचा सन्मान केला. ट्रम्प म्हणाले की, ७ डिसेंबर रोजी चार्ल्स यांनी त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा केला. काही आठवड्यांपूर्वी चार्ल्स यांना ब्रिगेडिअर जनरलच्या पदावर पदोन्नती देण्यावर स्वाक्षरी केली आणि आज सकाळी मी जनरल मॅक्गी यांच्या कार्यालयात त्यांना पदक दिले. देश तुम्हाला सलाम करत आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, मॅक्गी यांचा जन्म ओहियोतील क्लीवलँडमध्ये झाला आणि ते पहिल्या कृष्णवर्णीय पायलटपैकी एक आहेत. दुसऱ्या महायुद्धात १३० लढावू पायलटपैकी ते एक होते. यावेळी उपस्थितांनी जागेवर उभे राहत मॅक्गी यांना मानवंदना दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.