आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचा अध्यादेश तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींसमक्ष केले जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांगीतुंगी, नाशिक - आज मी ज्या भागात आलो आहे त्या भागात पाण्याचा प्रश्न, दुष्काळी स्थिती आहे. उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या हमीनुसार दुष्काळसदृश परिस्थिती लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी व्यक्त केली. मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेवपुरममध्ये तीनदिवसीय अहिंसा संमेलनाचे उद‌्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. दरम्यान, राज्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असून १७९ तालुके दृष्काळसदृश असल्याबाबतचा अध्यादेश तयार आहे. लवकरच ताे जारी केला जाईल, अशी हमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

 

राष्ट्रपती म्हणाले.... 
दुष्काळाची दाहकता काय असते हे आपण जाणतो. या स्थितीत मुख्यमंत्री गांभीर्याने लवकरात लवकर लक्ष घालतील अाणि आपण सारे मिळून या दुष्काळी परिस्थितीवरही शक्य तेवढ्या लवकर मात करू, असा विश्वास मला आहे... 


अध्यादेशात उपाययोजना अशा : अध्यादेशात ९ उपाययोजना आहेत. यात टँकरने पाणीपुरवठा, दुष्काळी तालुक्यांत महसूल वसुली थांबवणे, शैक्षणिक शुल्क माफ, शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणे, वीज बिल माफी, इतर आर्थिक मदत अशा विविध सवलती आहेत. 


जीआर तयार आहे... 
मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. १७९ तालुके दुष्काळसदृश असल्याचा अध्यादेश तयार आहे. लवकरच ताे जारी होईल. दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...