Home | International | Other Country | president susilo bambang

इंग्लिश बोलणे राष्ट्रपतींना पडले महागात

divya marathi team | Update - May 29, 2011, 02:51 AM IST

इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असली तरी इंग्लिश बोलल्याबद्दल मात्र इंडोनेशियाचे राष्ट्रपती चांगलेच अडचणीत सापडले आहेत

  • president susilo bambang

    जकार्ता, इंडोनेशिया - इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असली तरी इंग्लिश बोलल्याबद्दल मात्र इंडोनेशियाचे राष्ट्रपती चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इंग्लिश ही बेकायदेशीर भाषा असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच भाषेतून भाषणे केल्याबद्दल त्यांना न्यायालयाने झापले आहे.

    राष्ट्रपती सुसिलो बाम्बांग युधोयोनो यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली भाषणे ही इंडोनेशियन भाषेतून नसून इंग्लिशमधून आहेत. राष्ट्रपतींच्या या वागणुकीमुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. याची दखल सर्वाेच्च न्यायालयाने घेतली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच सरकारी अधिकारी यांनी इंडोनेशियाची राष्ट्रभाषाच वापरली पाहिजे, असे सर न्यायाधीश महफूद एमडी यांनी स्पष्ट केले.

Trending