आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला सौदीच्या युवराजांचा बचाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/रियाध- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात सीआयए या गुप्तचर संस्थेच्या अहवालावर, ‘हा निर्णायक नाही,’ अशी टिप्पणी केली आहे. खाशोगींच्या हत्येचा आदेश कोणी दिला होता याच्या कुठल्याही अंतिम निष्कर्षावर सीआयए पोहोचलेली नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.  

 
ट्रम्प म्हणाले की, खाशोगी यांची हत्या झालेली असली तरीही अमेरिका आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच इतर सहकारी देशांच्या हितासाठी सौदी अरेबियाचा मित्र म्हणून कायम राहील. सौदी अरेबियाशी रणनीतिक संबंध कायम राखणे आणि इंधनाच्या जागतिक किमतींवर लगाम लावणे हेच अमेरिकेच्या हिताचे आहे. माझ्यासाठी माझा देश सर्वोपरी आहे. त्यामुळे मी ही भूमिका घेतली आहे.  


ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अमेरिकेच्या संसदेच्या विदेश संबंध समितीने व्हाइट हाऊसला पत्र लिहून खाशोगी यांच्या हत्या प्रकरणाची फेरचौकशी करण्यास आणि त्याचा अहवाल चार महिन्यांत सादर करण्यास सांगितले आहे. सिनेटच्या विदेश संबंध समितीच्या रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक नेत्यांनी हे पत्र लिहिले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी खाशोगीच्या हत्येचे फर्मान जारी केले होते, असे सीआयएने आपल्या अहवालात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...