आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काबूल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अचानक अफगाणिस्तान गाठले. तेथे पाेहाेचल्यावर त्यांनी राष्ट्रपती माेहंमद अशरफ गनी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याचबराेबर येथे तैनात असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांचीही भेट घेतली.
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिला अफगाणिस्तान दाैरा आहे. गनी यांनी शुक्रवारी या भेटीबाबतचे छायाचित्र ट्विटरवर पाेस्ट केले. ही आमच्यातील द्विपक्षीय बैठक हाेती, अशी माहिती गनी यांनी त्यासाेबत दिली. आम्ही पूर्वेकडील अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्याबराेबरच मैदानात करण्यात आलेल्या लष्करी माेहिमांवरही उभय नेत्यांत चर्चा झाली. दहशतवादाविराेधातील लढाईत केलेल्या कामगिरीबद्दल ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या सैन्याचे काैतुक केले. दरम्यान, ट्रम्प गुरुवारी सायंकाळी येथे पाेहाेचले. काबूलपासून ५० किमी अंतरावरील अमेरिका तसेच संयुक्त लष्करी तळ बागरम विमानतळावर ही बैठक झाली. तालिबान शांतता चर्चा आणि करारासाठी कटिबद्ध असल्यास व त्याबद्दल प्रामाणिक असल्यास या संघटनेसाेबत युद्धबंदी करार व्हायला हवा, असे मत व्यक्त करण्यात आले.
सैनिकाच्या मृत्यूनंतर नाराजी
एकीकडे शांतता चर्चा सुरू असताना अफगाणिस्तानात तैनात एका अमेरिकन सैनिकाचा तालिबानच्या हिंसाचारात मृत्यू झाला हाेता. त्यानंतर ट्रम्प यांनी तालिबानसाेबतची शांती चर्चा संपुष्टात आली असल्याचे जाहीर केले हाेते. कारण अमेरिका व तालिबानने चर्चेची दारे सुरू केली हाेती. त्यामुळे दाेन्ही बाजूने चर्चा कधी सुरू हाेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुतांश राजकीय निरीक्षकांनी राजकीय तडजाेडीची गरज व्यक्त केली आहे. गेल्या १८ वर्षांपासून अफगाणिस्तान हिंसाचारात हाेरपळून निघाला आहे. देशातील हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकेने सैनिक तैनात केलेले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.