आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या विशेष पोलिस शाखेतील रवींद्र सपकाळेंना राष्ट्रपती पदक जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पाेलिस पदकांत महाराष्ट्रातील ५१ पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात अाला. यात अाठ शाैर्यपदके, ३ राष्ट्रपती पदके व ४० पाेलिस पदकांचा समावेश अाहे. देशभरातील ९४२ पाेलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. जळगावचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सपकाळे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 


जळगाव जिल्हा विशेष शाखेत सेवेत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बळीराम सपकाळे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शासनाकडून ही घोषणा करण्यात आली. त्यांनी वरणगाव पोलिस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात चांगली कामगिरी बजावत दोन आरोपींना अटक केली होती. या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच अमळनेर येथील खून, प्राणघातक हल्ला, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये चांगले तपास काम केले. 


राष्ट्रपती पोलिस पदके : शिवाजी तुळशीराम बोडखे, सहायक पोलिस आयुक्त नागपूर, दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी पुणे, बाळू प्रभाकर पवार, सहायक उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक. 


पाेलिस पदके : नवीनचंद्र रेड्डी- उपायुक्त मुंबई, धुला तेले- उपअधीक्षक नांदेड, राजेंद्रसिंग गौर- पोलिस निरीक्षक जालना, अनंत कुलकर्णी- निरीक्षक उस्मानाबाद, सय्यद अफसर सय्यद जहूर- हेड कॉन्स्टेबल परभणी, चिमाजी बाबर- हेड कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र, लातूर. 

बातम्या आणखी आहेत...