आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी-2; वीणाने शिवला हातातलं खेळण बनवलं आहे का?, शिवने दिले हे उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क- सध्या महाराष्ट्रात बिग बॉस मराठी 2 चे वारे वाहत आहेत. कार्यक्रमाचा शेवट जवळ आला आहे. आता या पर्वाचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांणाच लागली आहे. शेवटच्या टप्यात आता फक्त 6 स्पर्धक उरले आहेत. यात शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणा, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या सहाजणात 1 सप्टेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्याला ट्रॉफी आणि 25 लाखांचे बक्षीस मिळेल.

बिग बॉसच्या घरात रंगलेल्या पत्रकार परिषदेत सर्वच स्पर्धकांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी इतक्या दिवसानंतर बाहेरच्या व्यक्तींना पाहून सर्व स्पर्धक खूप खूश होते. यावेळी कित्येक दिवसानंतर मास्क न घातलेल्या लोकांना पाहतोय असे शिव म्हणाला तर अनेक दिवसानंतर पत्रकारांना भेटून खूप आनंद वाटल्याचे किशोरी शहाने यांनी सांगितले. किशोरी शहाणेंची तब्येत ठिक नसल्याने त्यांना बोलता येत नव्हते, तरीदेखील त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
 

पत्रकार परिषद सुरू होताच शिव हा वीणाच्या हाततले खेळणे बनले आहे का? हा प्रश्न शिवला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शिव म्हणाला की, "मी माझा वयक्तिक खेळ खेळत होतो. त्यामुळे मी कोणाचेही ऐकून खेळत नाहीये." यानंतर शिवानीला तू अंतिम फेरीसाठी खरचं पात्र आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिवानी म्हणाली की, "हो मी पात्र होते, त्यामुळेच मला पर या घरात आणले. खरंतर मी ज्या पद्धतीत बाहेर गेले त्याच्या आधी तीन आठवडे मी चांगली खेळंत होते. त्यानंतर मी परत आल्यावर सुद्धा माझं मागचं सगळं भरुन काढलं. मी पुन्हा खेळात इन झाले. त्यामुळे मला वाटतंय की मी हे नक्कीच डिझर्व्ह करते." असे वीणाचे उत्तर होते.
 

यावेळी शिवानी आणि वीणामध्ये परत वाद होतो का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू असताना वीणा आणि शिवानीला प्रश्न केला गेला की, घरातून बाहेर गेल्यावर कोणासोबत मैत्री कायम ठेवायला आवडेल आणि कोणाचं तोंडही बघायची इच्छा नाहीये? असे विचारताच, वीणा म्हणाली, शिवानी तिची मैत्रीण नाही, ती कधीच होऊ शकत नाही. पुढे म्हणाली की ज्या कोणाला तिचं तोंड बघायची इच्छा असेल, त्यांचं तोंड ती नक्कीच बघेल आणि ज्यांना नसेल त्यांचं तोंड तिला सुद्धा बघायचे नाही.

यावर शिवानी शांत कशी राहणार, ती म्हणाली, वीणा बरी दिसते त्यामुळे तिचं तोंड ती बघू शकेल पुन्हा. तसंच ती हे सुद्धा म्हणाली की जसं वीणा म्हणाली तसं मैत्री होऊच शकत नाही कारण मैत्री हा खूप मोठा शब्द आहे. त्यामुळे दोघींनी आपआपल्या पद्धतीने उत्तरे तर दिली पण इथे सुद्धा शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा त्यांच्यातली कटूता स्पष्ट झळकत होती. मैत्री तर होणार नाही पण कामानिमित्त जर एकमेकींसमोर आलो तर आम्ही नक्कीच एकमेकींना ओळख दाखवू असं दोघी देखील या वेळी म्हणाल्या.

 

बातम्या आणखी आहेत...