आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयमध्ये लाचखोरी : दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार SIT करणार प्रकरणाची चौकशी, जेटलींची पत्रकार परिषदेत माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील प्रमुख गुन्हे तपास संस्था सीबीआयमधील लाचखोरी प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. केंद्राने आरोप असलेल्या सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत नागेश्वर राव यांना सीबीआयचे प्रभारी संचालक नेमले आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याप्रकरमी माहिती दिली. सीबीआयमध्ये विचित्र स्थिती निर्माण झाली असून आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला नसल्याचे जेटली म्हमाले आहे. तसेच विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 

काय म्हणाले अरुण जेटली..
>> CBI ही मुख्य तपास संस्था आहे. या संस्थेची स्वायत्तता कायम राहण्यासाठी आरोपांची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे. 
>> सीबीआयच्या संचालकांवर विशेष संचालकांनी आरोप केले आहे. सीबीआयच्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांवरच आरोप आहेत. 
>> अशा स्थितीत याची चौकशी कोण करणार हा प्रश्न आहे. पारदर्शकपणे चौकशी होणे गरजेचे आहे आणि सरकारला चौकशी करण्याचा अधिकार नाही. 
>> सीबीआय केंद्रीय दक्षता आयोगाच्या अख्त्यारित असल्याने दक्षता आयोगालाच चौकशीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. 
>> दक्षता आयोगाने म्हटले आहे की, आरोप असलेले हे दोन अधिकारी किंवा त्यांचा प्रभाव असलेली कोणतीही संस्था याची चौकशी करू शकत नाही. त्यामुळे अधिकारी रजेवर असतील. 
>> आरोप असलेल्या अधिकाऱ्यांचा प्रभाव नसलेल्या एसआयटी मार्फत याची चौकशी केली जाईल. 
>> त्यात पूर्णपणे पारदर्शकता ठेवली जाईल.
>> दक्षता आयोगाच्या शिफारसीनुसार चौकशी आणि कारवाई याद्वारे संस्थेची विश्वासार्हता पुन्हा पूर्वीप्रमाणे व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. 

बातम्या आणखी आहेत...