आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या 'अमेरिका रिटर्न' महापौरांवर राजीनाम्याचा दबाव; भाजपचे बोट मुख्यमंत्र्यांकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुलाला खासगी सचिव दाखवून अमेरिकेतील परिषदेसाठी अधिकृत दौऱ्यावर घेऊन जाणाऱ्या नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. जिचकारांना पायउतार करण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेससह सर्वच पक्ष आक्रमक झालेले आहेत. मात्र, जिचकार यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. 


महापौर नंदा जिचकार यांना अमेरिकेतील एका अधिकृत परिषदेसाठी निमंत्रण आले होते. या परिषदेसाठी त्यांनी त्यांच्या मुलाला स्वत:चा अधिकृत सचिव असल्याचे दाखवून सरकारी खर्चाने अमेरिका दौऱ्यासाठी नेले. मात्र, मुलाला स्वत:चा खासगी सचिव दाखवल्याचा प्रकार उघड झाल्यापासून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतो आहे. अगदी भाजपमध्येही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या पुत्रप्रेमामुळे पक्षाची नाचक्की झाल्याची भावना भाजपच्या नगरसेवकांसह वरिष्ठ नेतेही दबक्या आवाजात मांडत आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी रोजच्या रोज महानगरपालिकेत तीव्र आंदोलने होत आहेत. महापौरांच्या कृतीमुळे शहराची मान लाजेने खाली गेली असून त्या राजीनामा देत नसतील तर भाजपने त्यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली आहे. 


महापालिकेच्या कायद्यामध्ये अविश्वासाची तरतूद नसली तरी अविश्वासावरील चर्चेची सूचना देऊन महापौरांच्या प्रतापावर येत्या २४ स्पप्टेंबर रोजीच्या सभेत चर्चा घडवण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजीनाम्याचा दबाव वाढत असताना याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील, असे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. महापौर नंदा जिचकारांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी एखाद्या दुसऱ्या महिला नेत्यास संधी देण्यात यावी, अशी मागणीही काही नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडे केल्याचे बोलले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...