आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगेल ढंगेल किर्तनकारांना रोखा... नाहीतर किर्तनाचा डिस्को होऊन समाजावर दुरगामी परिणाम होतील -जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - “नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ‘ हे कीर्तनाचे ब्रीद आहे. मात्र अलीकडे सभ्यतेची पातळी सोडून काही कीर्तनकार मंडळी नकला, हावभाव, विनोद  करतात.  बीभत्स वर्णन करून समाजाला हिंसक वळण लावण्याची कीर्तन ही जागा नाही. तरी कीर्तनकारांनी बेताल वागणे, बोलणे, नाचणे आदी टाळावे. नाही तर कीर्तनाचा डिस्को होऊन समाजावर दूरगामी परिणाम होतील. अशा बेताल कीर्तनकारांना पायबंद घालणे वारकरी संप्रदायातील प्रत्येकाचे काम आहे,’ असे आवाहन   ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी एका ध्वनीचित्रफितीद्वारे केले.

आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी माणसे कीर्तनानिमित्ताने एकत्र  येतात. मात्र, काही जण कीर्तनातून दारू कशी घ्यावी याचे ‘मार्गदर्शन’ करतात, टाळकरी, पखवाजवादक यांना दारू प्या, असे आवाहन करतात. वाईट गोष्टींचे उदात्तीकरण करणाऱ्या अशा कीर्तनकारांना  अखंड हरिनाम सप्ताहामध्ये निमंत्रण देऊ नये. 

जाणत्या कीर्तनकारांनी अशा कीर्तनकाराचे कीर्तन असणाऱ्या कार्यक्रमात जाऊच नये,  जेणेकरून समाजाला बेताल कीर्तनकारांची ओळख होईल, असे आवाहन बंडातात्यांनी केले आहे.
 

कीर्तनात अंगात आल्यावर पोलिसांत तक्रार द्यावी
कंठ दाटून येणे, अंगावर रोमांच उभा राहणे, डोळ्यातून अश्रू वाहणे अशा काही गोष्टी अष्ट सात्त्विक भावामध्ये येतात. मात्र कीर्तनामध्ये अंगात आल्यासारखे कीर्तनकार व श्रोतावर्ग किंचाळून नाचू लागले तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याद्वारे पोलिसांत तक्रार दाखल करावी,  असे आवाहन बंडातात्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...