आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील महिन्यापासून होंडाची कार 10 टक्के महागणार; राजेश गोयल यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- होंडा कार्स इंडियाने फेब्रुवारीपासून गाड्यांच्या किमतीत दहा टक्के वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया महाग होत असल्याने आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत झाल्याने किमतीत वाढ होणार आहे. कंपनीकडून दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, प्रीमियम एसयूव्ही सीआर-व्हीकीची किंमत १० हजार रुपये आणि अन्य मॉडेलची किंमत सात हजार रुपये वाढवण्यात येणार आहे.

 

एचसीआयएलचे वरिष्ठ व्हाइस प्रेसिडेंट व सेल्स अँड मार्केटिंग डायरेक्टर राजेश गोयल यांनी सांगितले की, दरवाढ थांबवण्यासाठी आमच्याकडून खूप प्रयत्न केले गेले. परंतु कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ व डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या घसरणीमुळे हे पाऊल उचलावे लागले.

 

बातम्या आणखी आहेत...