आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री शक्तीचा गौरवच समाजासाठी प्रेरणादायी : अभिनेत्री अनिता राज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- 'स्त्री शक्तीचा गौरवच समाजासाठी प्रेरणादायी असून, यापासून मलाही महिलांसाठी नवे काहीतरी करण्यास प्रोत्साहन मिळाले. मनुष्याचे वैचारिक सामर्थ्य त्याच्या स्वभावासह कार्याचा परिचय देत असते,' असे मत अभिनेत्री अनिता राज यांनी व्यक्त केले. 


राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनद्वारे मंगळवारी ११ सप्टेंबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित चौथ्या अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार २०१८ च्या वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. पुरस्कारांचे वितरण अभिनेत्री अनिता राज यांच्या हस्ते झाले. राज्यातील तीन कर्तबगार महिला अपंग उद्योजिका मीनाक्षी निकम, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, वयाच्या ६५ व्या वर्षी पतीच्या हृदयरोगावर उपचार करता यावेत म्हणून बारामती मॅरेथॉन धावणाऱ्या लता करे यांचा याप्रसंगी गौरव केला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे होते. अतिथी म्हणून खा. डाॅ. विकास महात्मे, आ. यशोमती ठाकूर, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, जि.प. माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे उपस्थित होते. या मंचावरुन ज्या स्त्रीशक्तीचा सन्मान होत आहे. त्या स्त्रीशक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे खा. डॉ. विकास महात्मे म्हणाले. लावणी सम्राज्ञी श्रीमती सुरेखा पुणेकर, नवऱ्याच्या आजारासाठी नऊवारीत मॅरेथॉन स्पर्धेत उतरून विजयी होणाऱ्या बारामतीच्या लता करे, चाळीसगावच्या 'स्वयंदीप'द्वारे इतरांना रोजगार देणारी स्वयंसिद्धा मीनाक्षी निकम यांना घोगडी, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे सन्मानित केले. उद्योजिका मीनाक्षी निकम यांनी त्या उद्योग चालवत नसून गरजूंच्या हाताला रोजगार देते. त्यामुळे त्यांना उद्योजिका मान मिळाल्याचे कबुल केले. मॅरेथॉनपटू लता करेंनी येणाऱ्या संकटांचा मी सामना केला. त्यामुळे पतीचे प्राण वाचवू शकले, असे सांगितले. संतोष महात्मे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पूजा राठोड यांनी, आभार रवींद्र गोरटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डाॅ. गणेश काळे, माधुरी ढवळे, क्षिप्रा मानकर, रवींद्र गोरटे, अशोक गंधे, जनराव कोकरे, हरिभाऊ शिंदे, जिनत तलत अजीज पटेल, अॅड. सुषमा बिसने, ज्योती वानखडे यांनी परिश्रम घेतले. 


सुरेखा पुणेकर यांच्या लावणीने रसिक मंत्रमुग्ध 
स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्यात 'या रावजी, बसा भावजी' या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी मी पहिला वर्गही शिकली नाही. वडील मजुरी करायचे, आई नर्तकी होती. ितचा वारसा मी पुढे चालवला. कलेची सेवा केल्याने माझी सर्वसामान्यांना ओळख झाली. लावणीनेच मला जीवन, प्रतिष्ठा, नाव सर्वकाही िदले. यामुळेच मी माझ्या पाच बहिणी, भावाला त्यांच्या पायावर उभे करू शकले. लावणीनेच मला एकदा नव्हे तर पाचवेळा अमेरिकेची वारी घडवली, अशी माहिती िदली. 

बातम्या आणखी आहेत...