आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन शांतीसाठी आश्रमात गेली होती 15 वर्षाची मुलगी, पण तिथे असे काही घडले की, आयुष्य झाले उद्ध्वस्त....कपड्यांवर मिळाले रक्ताचे डाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपुर : गुरूवारी भारत सेवाश्रम संघाचे संन्यासी सुजीत महाराज विरोधात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडिताने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे घरी जेवण बनवण्यावरून वहिणीसोबत भांडण झाले होते त्यामुळे मनःशांतीसाठी आश्रमात गेली. पण तेथे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे याची कल्पना देखील नव्हती. तिला एकटीला पाहून संन्यासाने आपल्या वासनेचा बळी ठरवले. 

 

पीडिताने FIR मध्ये काय सांगितले ते येथे वाचा

"आम्ही येथे किरायाच्या खोली राहतो. 18 डिसेंबर रोजी घरात जेवण बनवण्यावरून वहिणीसोबत खटके उडाले होते. यामुळे दुपारी एक वाजेदरम्यान भारत सेवाश्रम संघाच्या मंदिराजवळ बसले होते. जेणेकरून संध्याकाळी आरती करून मन शांत झाल्यावर घरी जाणार होते. तेवढ्यात सेवाश्रमाचे सुजीत महाराज आले आणि मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. तेथे त्यांनी समोसे आणि द्राक्ष खाण्यास देऊन पाणी पाजले. त्यानंतर माझ्या शरीरासोबत गलिच्छ हरकत करण्यास सुरुवात केली. मी विरोध केल्यानंतर त्यांनी मला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर माझे काढले आणि माझ्यासोबत जबरदस्तीने संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली होती. संध्याकाळी 5 वाजेदरम्यान माझी वहिणी मला शोधत तेथे आली. वहिणी आल्यानंतर मी बाथरूममध्ये पळत जाऊन कपडे परिधान केले. त्यानंतर सुजीम महाराजने दरवाजा उघडला आणि वहिणीला उलट-सुलट समजावू लागले. म्हणाले की - तिला का मारहाण करता? जेवण का बनवायला सांगता? यानंतर त्यांनी माझ्या वहिणीला 10 बिस्कीट पुडे, कुरकुरे. एक शर्ट आणि एक टी-शर्ट देऊन मला त्यांच्यासोबत जाऊ दिले. घडलेल्या घटनेमुले मी खूप हादरून गेले होते. त्यामुळे मी रात्री जेवण न करताच झोपी गेले. पण 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेदरम्यान हिम्मत करून वहिणीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आरोपी सुजीत महाराजावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी."


भारत सेवाश्रम संघातून महाराजाला केले बरखास्त 
भारत सेवाश्रम संघाचे सहायक सचिव अजीत महाराज यांनी सांगितले की, सुजीत महाराज यांना संघातून बरखास्त करण्यात आले आहे. यामुळे त्यांच निष्पक्षपणे चौकशी करण्यास मदत होईल. संबंधीत प्रकरणाची माहिती कलकत्ता येथील मुख्यालयाला दिली आहे. गेल्या 17 वर्षांपासून सुजीत संघात सेवा देत आहे. पण याआधी कधी त्यांच्यावर आरोप लावण्यात आला नव्हता. त्यामुळे मुलीने केलेल्या आरोपावर विश्वास बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

कपड्यांवर मिळाले रक्ताचे डाग
पोलिसांनी पीडितेची रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे. तपासणीचा अहवाल अजून आला नाही पण पीडिताला ब्लीडिंग झाली असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग मिळाले आहे. 

 

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली संन्यासाची करतूद 

पोलिसांनी संघ परिसराती सीसीटीव्ही कॅमेरांची रेकॉर्डिंग तपासली आहेत. यामध्ये बुधवारी दुपारी 2 वाजता पीडिता संन्यासी सुजित महाराजाच्या खोलीत जाताना दिसत आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता पीडितेची वहिणी दरवाजा ठोठावताना दिसत आहे. थोड्यावेळाने पीडिता आपल्या वहिणीसोबत खोलीतून बाहेर पडताना दिसून आली. याआधी पीडिता 3 तास खोलीच्या बाहेर निघाली नव्हती. पण सुजित महाराज एकदा आपल्या खोलीतून बाहेर आले होता आणि पुन्हा मध्ये जाताना दिसला. पोलिसांना पुरावा म्हणून सदर सीसीटीव्ही फूटेज जप्त केले आहे. तसेच संन्यासाच्या हालचाली संशयास्पद दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

 

आरोपी संन्यासी सुजित महाराज याची चौकशी करण्यात येत आहे. .या प्रकरणाबाबत एक ना एक गोष्टीची तपासणी होणार आहे. तपासणीनंतर संन्यासाला तुरूंगात पाठविण्यात येणार असल्याचे सिटी एसपी प्रभात कुमार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...