आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

: असे आहेत पंतप्रधान मोदींचे नवे प्रमुख सचिव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण के. लहरी, माजी मुख्य सचिव, गुजरात डाॅ. प्रमोदकुमार मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रमुख सचिव झाले ही गुजरात केडरच्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांसाठी गौरवाची बाब आहे. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच डाॅ. मिश्रांना प्रमुख सचिवपदाची जबाबदारी मिळू शकते, असे मानले जात होते. मात्र ,तेव्हा नृपेंद्र मिश्रा प्रमुख सचिव झाले. २००१ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी डाॅ. मिश्रांना मुख्य सचिव म्हणून पसंती दिली होती. मिश्रांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोदींसह ३ वर्षे खूप चांगले काम केले. ११ आॅगस्ट १९४८ ला जन्मलेल्या प्रमोद मिश्रांना त्यांचे जवळचे मित्र ‘बाबू’ म्हणतात. मिश्रांनी जेव्हा गुजरात केडरमध्ये प्रवेश केला आणि ते प्रशिक्षणासाठी आले तेव्हा मी त्यांना आणि त्यांच्या सर्व बॅचमेट्सना आपल्या बडोदा येथील निवासस्थानी चहासाठी आमंत्रित केले. तेव्हा त्यांनी स्वत:च काॅफीच्या बियांची पावडर बनवली आणि ती गरम पाण्यात मिसळून स्वादिष्ट काॅफी बनवली होती. त्यातून ते प्रत्येक वस्तूमधून चांगली गोष्ट काढून त्याचा चांगला प्रयोग करू शकतात हे स्पष्ट होते. डाॅ. मिश्रा मृदुभाषी आहेत. १९७८ मध्ये मी त्यांना बनासकांठा कलेक्टरचा चार्ज सोपवला होता. २००१ मध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख सचिवपदीही त्यांचे स्वागत केले होते हाही योगायोग. गुजरात वीज मंडळात त्यांनी सदस्य म्हणून मंडळाची अक्षमता आणि नुकसानीची कारणे शोधून काढली आणि त्यांचे निराकरणही केले.  जानेवारी २००१ च्या कच्छ भूकंपाच्या वेळी डाॅ. मिश्रा कृषी विभागाच्या प्रमुख सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. तेव्हा त्यांना आपत्ती व्यवस्थापनाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडली. मदत आणि पुनर्वसन कामावर एक पुस्तकही लिहिले. २००८ मध्ये गुजरात सरकारद्वारे स्थापन गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या नेतृत्वाचे आव्हान स्वीकारले. संयुक्त राष्ट्रांनी डाॅ. मिश्रांना मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीच्या त्यांच्या योगदानासाठी सन्मानितही केले. गुजरातच्या कृषी विभागाचे मुख्य सचिव म्हणून काम करताना डाॅ. मिश्रांनी खरिपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. २००४ मध्ये केंद्र सरकारमध्ये कृषी सचिवपदी काम केले. त्याआधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव म्हणून काम केल्याने त्यांना ‘मोदी मॅन’ म्हणत त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला, पण डाॅ. मिश्रांनी तक्रार केली नाही.(त्यांनी ‘दिव्य मराठी’चे चिंतन आचार्य यांना सांगितल्यानुसार)

रिलायन्स कंपनीला मिळत असलेल्या सवलतींबाबत घेतली होती कठोर भूमिका
डाॅ. मिश्रा पंतप्रधान मोदींचे अतिरिक्त सचिव होते तेव्हा त्यांनी दिल्लीत बदल्या आणि नियुक्त्या राज संपवले. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची नियुक्ती अधिकृत घोषणेआधी लीक झाली नाही. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या सर्व फायली त्यांच्याकडूनच जात असत. नव्वदच्या दशकात जेव्हा ते गुजरात वीज मंडळात होते तेव्हा एकदा त्यांनी रिलायन्स ग्रुपला मिळत असलेल्या सवलतींबाबत कठोर भूमिका घेतली होती. त्यांनी काही वर्षांत पद्म पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत आवश्यक बदल केले. ते योग्यताआधारित बनवले. ते यूपीए-१ च्या वेळी कृषी सचिव होते. तेव्हा त्यांनी पीक विमा योजनेची सूचना केली होती. यूपीए आणि नंतर मोदी सरकारनेही त्यांच्या या विचारावर काम केले. २०१६ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाली.