आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Modi Said To MPs Will Have To Stand Against Those Who Talk About Breaking The Country

देश तोडण्याच्या गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध ताकदीने उभे ठाका; पीएम मोदींचे भाजप खासदारांना उपदेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काही लोक देशाचे तुकडे-तुकडे होतील अशा घोषणा देत आहेत. अशा लोकांच्या विरोधात ताकदीने उभे ठाकण्याची गरज आहे असे उपदेश पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षाच्या खासदारांना दिले आहेत. भाजपच्या संसदीय गटाची बैठक मंगळवारी संसदेच्या लायब्ररी हॉलमध्ये पार पडली. यावेळी खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. विकासाकरिता देशात शांतता, ऐक्य आणि सद्भाव आवश्य आहे. केवळ बोलल्याने असे होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत माता की जय आणि वंदे मातरम् या मुद्द्यांवरून राजकारण करणाऱ्यांचा देखील समाचार घेतला. मोदी म्हणाले, "काही नेत्यांना 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' बोलण्याची लाज वाटते. असले लोक देशाचे तुकडे-तुकडे होतील अशा घोषणा देतात. अशा लोकांच्या विरोधात उभे ठाकण्याची गरज आहे." पीएम मोदींनी पुढे सांगितले, की इतर पक्षाच्या नेत्यांसाठी राजकारण प्राधान्य असू शकते. पण भाजपसाठी राष्ट्र हेच सर्वप्रथम आहे. हाच संदेश सर्व खासदारांनी अवलंबला पाहिजे. या बैठकीची माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी म्हणाले, की पीएम मोदींनी आपल्या संबोधनात स्वस्त औषध सुविधा योजनांचे कौतुक केले. यातून गोर-गरीबांना दिलासा मिळाल्याचे ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...