आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण कायम राहील, 1 कोटीवर राेजगार; पंतप्रधान मोदींची वृत्‍तसंस्‍थेला मुलाखत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी सांगितले की, देशात गेल्या वर्षभरात एक कोटीपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती झाली. नोकऱ्याच मिळत नाहीत, असा अपप्रचार लोकांनी बंद केला पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था वाढत असताना नाेकऱ्याच नाहीत, हे कसे शक्य अाहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, आरक्षण बंद केले जाणार नाही. याबाबतीत कसलाही संशय नसावा. मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या सर्वच नेत्यांच्या आरोपांना उत्तरे दिली. मुलाखतीचे अंश  पुढीलप्रमाणे...

 

एनडीएतील पक्षांचा भाजपवर विश्वास उडत चालला आहे?
मोदी : याचे उत्तर लोकसभेतील अविश्वास प्रस्ताव आणि राज्यसभा उपसभापतींच्या निवडणुकीतून मिळेल. त्यांच्या निकालांतून स्पष्ट आहे की कोणती आघाडी अभेद्य आहे आणि कोणती फुटत आहे. आम्हाला मित्रपक्ष नसलेल्यांनीही पाठिंबा दिला. एनडीएत नव्या मित्रपक्षांचे स्वागत आहे.  


लोेकसभेतील राहुल गांधींची गळाभेट बालिश असल्याचे तुम्हाला वाटते का?
मोदी : ते तुम्हीच ठरवा. ठरवता येत नसेल तर डोळे मिचकावण्याचा प्रकार पाहा, तुम्हाला अापाेअाप उत्तर मिळेल. त्यांची एक वेगळी स्टाइल आहे. कधी आणि कुणाचा द्वेष करायचा, कुणाशी प्रेम करायचे आणि त्याचा देखावा कसा करायचा हे ते ठरवतात.

 

एनआरसी : भारताच्या एकाही नागरिकाला देश साेडावा लागणार नाही.

 

अत्याचार-हिंसाचार : महिलांवर अत्याचार व जमावाच्या हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी आहेत.

 

आयआयटी मुंबईसाठी केंद्राकडून १ हजार कोटी
आयआयटी मुंबईला केंद्राकडून  १ हजार कोटींचे साहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यातून आयआयटी मुंबईत उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण हाेतील.

 

बातम्या आणखी आहेत...