आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र माेदी भूतानमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / थिम्पू - पंतप्रधान नरेंद्र माेदी शनिवारी दाेनदिवसीय दाैऱ्यावर जाणार आहेत. ते राॅयल युनिव्हर्सिटी आॅफ भूतानमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील. माेदींच्या या दाैऱ्यावर शिक्षणासह इतर क्षेत्रातही शेजारी देशांत १० करारांवर स्वाक्षऱ्या केला जातील.  पंतप्रधान माेदी शनिवारी भूतानच्या पाराे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाेहाेचल्यानंतर सेम्ताेखा दजाेंगला जातील. त्यानंतर माेदी ताशिछाेदजाेंगला भेट देतील. तेथे त्यांना लष्कराद्वारे सलामी दिली जाईल.  ताशिछाेदजाेंगमध्ये पंतप्रधान भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वाँगचुक यांचीही भेट घेतील. येथे पंतप्रधानांच्या सन्मानार्थ रॅली काढली जाणार आहे. त्याचबराेबर ग्यालयाेंग त्शाेखांगमध्ये माेदी भूतानचे राजे जिग्मे सिंगे वाँगचुक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.  भारताला पुढे नेण्याचा माेदींचा उद्देश चांगला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान लाेटे त्शेरिंग गाैरवाेद॰गार काढले. त्शेरिंग यांनी फेसबुक पाेस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले, मी दाेन्ही देशांतील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे स्पष्टपणे पाहताेय. मी भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताे. आम्ही शांतता व समृद्ध भारतासाठी प्रार्थना करताे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.  ५ हजार काेटी रुपयांच्या मदतीचा पहिला हप्ता जारी : भारतासाेबत विकासात भागीदारीसह द्विपक्षीय संबंध हे या दाैऱ्याचे दाेन महत्त्वाचे पैलू आहेत. भारताने गेल्या डिसेंबरमध्ये भूतानच्या १२ व्या पंचवार्षिक याेजनेला मदत म्हणून ५ हजार काेटी रुपयांचा निधी देण्यास कटिबद्धता दर्शवली हाेती. त्याचा पहिला हप्तादेखील जारी करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्मारकास भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र माेदी राष्ट्रीय स्मारकालादेखील भेट देतील. त्यांच्या भेटीनिमित्ताने ताशिछाेदजाँगमध्ये माेदींच्या सन्मानार्थ एका सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयाेजन करण्यात आले आहे. दाैऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी माेदी राॅयल विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी माेदी दिल्लीला रवाना हाेतील. 

पाच प्रकल्पांचे उद॰घाटन
भूतानमध्ये माेदींच्या हस्ते मांगदेछू जलविद्युत संयंत्र थिम्फूमध्ये इस्राेनिर्मित पृथ्वी स्थानकाचे उद॰घाटन होईल. भूतानचे पंतप्रधान लाेटे शेरिंग यांच्यासह शिष्टमंडळासह हाेणाऱ्या चर्चेतही ते सहभागी हाेतील. मांगदेछू जलविद्युत याेजनेचे त्यांच्या हस्ते उद॰घाटन हाेणार आहे. हा प्रकल्प भारताच्या मदतीने उभारण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...