Home | National | Other State | Prime Minister Narendra Modi and NDA leaders change their name on twitter adds Chowkidar in beginning

पीएम मोदींनी नाव बदलले! ट्विटरवर आपल्या नावात जोडले चौकीदार; भाजप नेत्यांनीही नावे बदलून केले समर्थन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 12:36 PM IST

लोकसभा निवडणुकीत मोदींचे नवे घोषवाक्य 'मैं भी चौकीदार!'

 • Prime Minister Narendra Modi and NDA leaders change their name on twitter adds Chowkidar in beginning

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर ट्विटर अकाउंटवर आपले नाव बदलले आहे. त्यांनी आता आपले नाव चौकीदार नरेंद्र मोदी असे केले आहे. मोदींसह रविवारी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि इतर अनेक भाजप नेते आणि मंत्र्यांनी आपल्या नावात अशा स्वरुपाचा बदल केला आहे. सोबतच, ज्या-ज्या मंत्र्यांनी असे केले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा नावात बदल करून चौकीदार जोडण्याचे आवाहन केले आहे. तत्पूर्वी पीएम मोदींनी ट्विटरवरून 'मैं भी चौकीदार' ही मोहिम सुरू करून लोकसभा निवडणुकीत नवे घोषवाक्य तयार केले आहे.


  चौकीदार करतोय ट्विटरवर ट्रेंड
  15 मार्च रोजी मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करून या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यामध्ये केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना, भ्रष्टाचारावर अंकुश, हायवे निर्मिती आणि देशाचे संरक्षण इत्यादी मजबूत करण्याचा उल्लेख केला होता. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी 31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदींशी जुडण्याचे अपील केले. भ्रष्टाचार आणि कचरा विरोधात लढणारी प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे असे मोदी म्हणाले.

  मुख्यमंत्र्यांचे समर्थन
  मोदींच्या या मोहिमेला समर्थन देणाऱ्या इतर भाजप नेत्यांमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद सिंह रावत, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास, पक्षाचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी, संबित पात्रा, छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह, नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि मीनाक्षी लेखी यांचा समावेश आहे.

Trending