National / पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली, मोदी म्हणाले- 'कर्मण्ये वाधिकारस्ते काय असतं, हे सुषमाजींनी दाखवून दिले...'


शाह म्हणाले- सुषमाजींनी जगभरात भारतीयांची मदत केली
 

दिव्य मराठी वेब

Aug 13,2019 08:00:00 PM IST

नवी दिल्ली- माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आज(मंगळवार) श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत अनेक नेते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले- "कर्मण्येवादिकारस्ते काय असत, हे सुषमाजींनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक रुप होते. त्यांच्या जीवनात अनेक वळण होती."


कार्यकर्त्यांसाठी मोठी प्रेरणा- मोदी
ते म्हणाले- "भाजपच्या कार्यकर्त्याच्या रुपात आणि एका साथीदाराच्या रुपात त्यांच्यासोबत काम करताना अनेक अनुभव आले. व्यवस्था आणि अनुशासनाचे पालन करुन जे काम मिळाले, ते पूर्ण करणे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उर्जा भरणे हे सुषणाजींनी केले. सार्वजनिक जीवनात त्यांनी एक आदर्श सादर केला आले. त्यांचे भाषण प्रभावी असायचे आणि एन नवीन प्रेरणा द्यायचे. कृष्ण भक्तीला त्या समर्पित होत्या."


"त्या मला जय श्रीकृष्ण म्हणायच्या आणी मी त्यांना जय द्वारकाधीश म्हणत होतो. कर्मण्ये वाधिकारस्ते काय आहे, हे सुषमाजींनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. त्यांनी अनेकवेळा कलम 370 वर भाष्य केले होते. हे प्रकरण त्यांच्या खूप जिव्हाळ्याचे होते. सुषमाजी गेल्यानंतर मी त्यांची मुलगी बांसुरीला भेटलो. त्यांनी सांगितले की, त्या खूप खूश होत्या, सुषमाजी खूप आनंदात गेल्या आहेत."

गृहमंत्री अमित शाह म्हणाले- "सुषमाजींनी जगभरातील भारतीयांची मदत केली." सरंक्षममंत्री राजनाथ सिंह म्हणाले- "त्या जन-मनच्या नेत्या होत्या."


6 ऑगस्टला सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला
सुषमा स्वराज (67)यांचा 6 ऑगस्टला रात्री मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

X
COMMENT