आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदी आणि प्रियांकाच्या गप्पा ऐकून निकला आवरले नाही हसू, निकला काही कळले नाही, पण न्याहाळत राहिला दोघांना : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या वेडिंग रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी निक आणि प्रियांकासोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिवाय जोनास कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्यांनी प्रियांकाच्या सासूबाई डेनिस जोनासर यांना हात जोडून नमस्कार केला आणि नंतर आपल्या शेजारी उभे राहण्यास सांगितले. मोदी यांनी प्रियांका, निक, सासू डेनिस, आई मधू चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांच्यासोबत फोटोसाठी पोज दिली.


प्रियांका आणि मोदी यांना न्याहाळत राहिला निक... 
- मोदी यांनी मंचावर येऊन प्रियांका आणि निकला शुभेच्छा दिल्या. गप्पा मारत असताना प्रियांका आणि मोदी यांना हसू आले. पण ते  दोघे नेमक्या कुठल्या गोष्टीवरुन हसले हे निकला समजले नाही. तो दोघांना न्याहाळत राहिला. 


- निकयांका यांचे लग्नानंतरचे हे पहिले रिसेप्शन होते. हे रिसेप्शन दिल्लीतील ताज पॅलेस हॉलेटमध्ये झाले. याच महिन्यात दुसरे रिसेप्शन मुंबईतही होणार आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...