आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नीति आयोगात 40 पेक्षा अधिक अर्थशास्त्र तज्ज्ञ आणि उद्योग तज्ज्ञांसोबत 2 तास बैठक घेतली. वृत्तसंस्थेच्या सुत्रांनुसार, मोदींचे लक्ष्य पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर होते. त्यांनी खपत आणि मागणी वाढीसाठीच्या उपायांवर सुचना मागवल्या आहेत.
यावेळी बजेटच्या तयारीत मोदींची सक्रिय भूमिका
बैठकीत नीति आयोगचे उपाध्यक्ष राजीव कुमार, सीईओ अमिताभ कांत आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि वाढ करण्याच्या उपयांवर चर्चा झाली. या दरम्यान कृषी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसह दुसऱ्या क्षेत्रीतील मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री पीयूष गोयल आणि पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन बिबेक देबरॉय यांची उपस्थिती होती.अर्थसंकल्पापूर्वी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मोदींची ही 13 वी बैठक होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.