Home | Maharashtra | Mumbai | Prime Minister Narendra Modi in Mumbai IIT today live news and update

IIT मुंबईला 1 हजार कोटी रुपयांचा निधी देणार, दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

दिव्य मराठी | Update - Aug 11, 2018, 01:29 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभामध्ये ते हजेरी लावणार आहेत.

 • Prime Minister Narendra Modi in Mumbai IIT today live news and update

  मुंबई- आयआयटी मुंबईला 1 हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. संस्थेच्या 56 व्या दिक्षांत सोहळ्यात ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. मुंबई आयआयटीतील मुलांचा जगभरात डंका आहे, जगभरातील टॉप संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश आहे असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी बोलताना केले.

  Delighted to address the convocation ceremony at IIT-B. Here is my speech.` https://t.co/KNj8u9AfNz
  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी मोदी मुंबईत दाखल झाले. त्यावेळी मुंबई विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागरराव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर मोदी आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख पाहूने म्हणून उपस्थित होते.


  काय म्हणाले मोदी...
  - आयआयटीतील मुलांचा जगभरात डंका...
  - जगभरातील टॉप संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश...
  - आयआयटीचे विद्यार्थी देशाच्या विकासात सक्रीय...
  - तंत्रज्ञान क्षेत्रात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.
  - आयआयटी मुंबईसाठी हजार कोटींची मदत...
  - देशाच्या काण्याकोपऱ्यातून विद्या्र्थी मुंबई आयआयटीत...
  - नव्या तंत्रज्ञानामुळे देशाच्या विकासाला मदत होईल...
  - सौर उर्जा, बायोइंधनाचा येत्या काळात वापर होईल....
  - शिक्षणापासून ते पर्यावरण क्षेत्रात भारताची आघाडी...
  - सध्या नवनव्या उद्योगांची भारतात सुरूवात...
  - स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर...

  मुंबई आयआयटीची 1958 मध्ये स्थापना झाली होती. यंदा संस्था हिरक महोत्सव साजरा करत आहे. संस्थेचा आज 56 वा दीक्षांत समारंभ आहे. यानिमित्ताने उपस्थित असले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

Trending