आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Is Going To Start The Rally After A Meeting With Udayan Raje

उदयनराजेंसाठी सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी फोडणार प्रचाराचा नारळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची मदार पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आहे. हरियाणातही निवडणुका असल्याने मोदी-शाह यांनी दोन्ही राज्यांना पुरेसा वेळ दिला आहे. मोदी १७ तारखेला उदनयराजे भोसले यांच्यासाठी सभा घेऊन आपल्या मोहिमेचा प्रारंभ करतील. ते ३ दिवसांत ९ सभा घेणार आहेत. शेवटची सभा मुंबईत होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच आमंत्रित केले आहे. यासोबतच मोदी हे विधानसभेचाही प्रचार करणार आहेत. सातारा, पुणे व मुंबई ही ठिकाणे नक्की झाली असून अन्य ठिकाणे निश्चित केली जात आहेत.

शहांच्या १८, फडणवीसांच्या १०० सभा
अमित शाह ८ तारखेला बीडमधील भगवान शक्ती गडावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहून पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. त्यांच्या एकूण १८ सभा आयोजित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज्यात १०० च्या आसपास सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्य पालथे घालून प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे.