आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर, उपराष्ट्रपती आणि अमित शाह पोहोचले एम्समध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशीरा एम्सने अटल बिहारी वाजपेयी यांचे मेडिकल बुलेटिन जाहिर केले. यामध्ये सांगितले आहे की, गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे. एम्सने 11 वाजता मेडिकल बुलेटिन सादर केले. गुरुवारी सकाळपासूनच लोक एम्स रुग्णालयात पोहोचत आहेत. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू सकाळी 6.30 वाजता एम्समध्ये पोहोचले. यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शाहसुध्दा एम्समध्ये पोहोचले. 

 

पंतप्रधान मोदी बुधवारी संध्याकाळी त्‍यांच्‍या तब्‍येतीची विचारपूस करण्‍यासाठी एम्‍स रूग्‍णालयात पोहोचले होते. यूरिन इन्‍फेक्‍शनच्‍या त्रासामुळे वाजपेयींना  11 जूनपासून एम्‍समध्‍ये भरती करण्‍यात आले आहे. वाजपेयी मागील 9 वर्षांपासून या आजारामुळे त्रस्‍त आहेत. मोदींपूर्वी केंद्रीय मंत्री स्‍मृती इरानी यांनीही वाजपेयींची भेट घेऊन त्‍यांची विचारपूस केली होती.  

 

2009 मध्‍ये बिघडली होती तब्‍येत, व्‍हेंटिलेटरवर होते अटलजी
- 2009 मध्‍ये वाजपेयी यांची तब्‍येत बिघडली होती. श्‍वास घेण्‍यास त्रास होत असल्‍यामुळे त्‍यांना व्‍हेंटिलेटवर ठेवण्‍यात आले होते. नंतर त्‍यांची तब्‍येत ठिक झाली होती व त्‍यांना हॉस्पिटलमधून सुट्टीही देण्‍यात आली होती.
- यानंतर वाजपेयी यांची स्‍मृतीही हळूहळू जात असल्‍याचे वृत्‍त होते. या कारणामुळे ते कोणाशीही बोलत नसत. त्‍यांनी लोकांना ओळखणेही बंद केले होते.  

 

बातम्या आणखी आहेत...