Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Prime minister Narendra Modi sabha in nagar

'शरद पवार...तुम्हाला झोप तरी कशी येते?' अहमदनगरमधील सभेत मोदींची शरद पवारांवर टिकेची झोड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 04:47 PM IST

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी घेतली प्रचारसभा

 • Prime minister Narendra Modi sabha in nagar

  अहमदनगर- 'देशात दोन पंतप्रधान करण्याची मागणी करणाऱ्यांसोबत काँग्रेस उभी आहे. शरद पवारांनी तर देशासाठी काँग्रेस सोडली होती. मग आता पवार काँग्रेससोबत कसे? तुम्हाला झोप तरी कशी येते?' असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

  अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केला.

  मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे-

  पाच वर्षात निर्णय घेणारे मजबूत सरकार जगाने पाहिले.
  देशाला प्रामाणिक चौकीदार हवा आहे की भ्रष्टाचारी नामदार?
  यापूर्वी देशात रिमोटवर चालणारे सरकार होते.
  काँग्रेसच्या काळात देशात अस्थिरता निर्माण झाली होती.
  शरद पवार कधीपासून भारताकडे विदेशी चष्म्यातून पाहू लागले?


  नगरमधील सभे काळे कपडे घालून जाण्यास मनाई
  या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही. तसेच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचे बनियान घातले असल्यास ते उरवण्यास सांगितले गेले. यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.

Trending