आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Warns All MPs To Attend Parliament Every Day, India Should Work Towards Releasing TB

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांना दररोज संसदेत हजर राहण्याची दिली ताकीद, तसेच भारताला टीबी मुक्त करण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजप खासदारांच्या बैठकीत पंरप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांच्या अनुपस्थितीवर कडक पाउले उचलली आहेत. ते म्हणाले सत्रादरम्यान लोकसभेतून गैरहजर राहण्याचा कोणताही बहाणा चालणार नाही. सगळ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. त्यांनी संसदीय कामकाजापासून गायब राहणाऱ्या खासदारांची यादी मागवली आहे. संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशींनी बैठक संपल्यावर ही माहिती दिली. बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकरदेखील उपस्थित होते.


सरकारी स्किम सामान्य नागरिकांपर्यं पोहचवणे ही खासदारांची जबाबदारी
जोशी म्हणाले पंतप्रधानांनी खासदारांना सामान्य नागिरकांपर्यंत पोहचण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारची प्रत्येक स्किम सामान्य जनतेपर्यंत कशी पोहचवता येईल याकडेह लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच जगात 2030 पर्यंत टीबीला नष्ट करण्याचे लक्ष आहे, पण पंतप्रधानांनी देशातून 2025 पर्यंत टीबी संपवण्याचे लक्ष ठेवले आहे. यासाठीही काम करण्याचे आदेश खासदारांना दिले आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...