आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच दिवसांत दहाव्यांदा पंतप्रधान राज्यात; मोदी म्हणाले, जे भ्रष्ट आहेत, त्यांना माझ्याकडून 'कष्ट' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरुक्षेत्र- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हरियाणातील कुरुक्षेत्रात प्रचारसभा घेतली. मागील पाच दिवसांत त्यांची ही ९ वी सभा आहेे तसेच राज्याचा दहावा दाैरा आहे. पंतप्रधान मोदी यांनी कुरुक्षेत्र येथूनच झज्जर येथील बाढसामध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे उद्घाटन केले. त्यानंतर स्वच्छ शक्ती परिषदेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'माझ्या योजनांची मजाक उडवली गेली. सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेले लोक माझ्यावर टीका करत आहे. 

 

२०१४ मध्ये तुम्ही पूर्ण बहुमत दिले. त्यामुळे आज केंद्र सरकार इतके काम करू शकत आहे. प्रामाणिक लोकांचा चाैकीदारवर विश्वास आहे. परंतु जे भ्रष्ट लोक आहे, त्यांना मोदींपासून कष्ट होत आहे. कोणाच्या धमक्या किंवा शिव्यामुळे चौकीदार थांबणार नाही. भ्रष्टाचार मुक्त भारताचे अभियान अधिक तीव्र होईल. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना मी येथूनच सुरू केली होती. आज ही संपूर्ण देशात हे जनआंदोलन झाले आहे. आयुष्मान भारत योजनेची पहिली लाभार्थी हरयाणाची बेटीच आहे.' 

 

पंचायती राज इन्स्टिट्यूशन महिलांना भेटले मोदी : 
कुरुक्षेत्रामध्ये पंतप्रधान पंचायती राज इन्स्टिट्यूशनच्या प्रतिनिधी महिलांशी सरळ संवाद साधला. त्यात आशा वर्कर, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेच्या सदस्यांचा समावेश आहे. तसेच पंतप्रधानांनी आयुर्वेद राष्ट्रीय विद्यापीठाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प पंचकुला येथे तयार होत आहे. त्यावर २७० कोटी खर्च होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...