आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील तीन लाख कुटुंबांना आयुष्यमान योजनेचे आरोग्य कवच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आयुष्यमान भारत या विमा योजनेचा जिल्ह्यातील तीन लाख ९ हजार कुटुंबांना लाभ मिळला आहे. ही योजना सुरुवातीला राज्यातील ७९ शासकीय रुग्णालयांमध्ये राबविली जाईल. ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातील. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा व लहान मुलांच्या कर्करोगावरील उपचारांचा समावेश केला आहे. या योजनेचा लाभार्थी आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधून लाभ घेता येईल. येताना शिधापत्रिका, फोटो व आधारकार्ड आणण्यास प्रशासनाकडून सांगितले आहे. 


श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आयुष्यमान भारत- पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे उद््घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्राथमिक स्वरूपात रेवण चव्हाण, सिद्राम बोराळे, सागर सोनकांबळे, सिध्दार्थ तळभंडारे, सरनाथ गायकवाड, सारिका बनसोडे या लाभार्थ्यांना विमा कार्डचे वाटप केले. या योजनेचा लाभ कच्चा घरात राहणारी, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग कुटुंबप्रमुख असलेले, अनुसूचित जाती व जमातीमधील, भूमिहीन मजुराच्या कुटुंबांबरोबर भिक्षुक, स्वच्छता कर्मी, कंत्राटी कर्मचारी, कचरा वेचक कुटुंब, घरकाम करणारे, गटई कामगार, फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर, गवंडी, रंगकाम करणारे, वेल्डर सफाई कर्मचारी, माळीकाम करणारे, कारागीर, हस्तकला, शिंपी काम करणारे, वाहतूक कर्मचारी-चालक आदींचा समावेश असेल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, नगरसेवक शिवानंद पाटील, सभागृह नेते संजय कोळी आदी उपस्थित होते. हे लाभार्थी निवडण्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ. शेगर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रुपाली उंडे यांनी सूत्रसंचालन केले. 


आपले नाव पाहण्यासाठी सिव्हिलमध्ये संपर्क साधा 
आयुष्यमान भारत विमा योजनेत लाभार्थ्यांचे नाव आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी आरोग्यमित्र यांना संवाद साधता येईल. या योजनेचा लाभार्थी शोधण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, बी ब्लॉक किंवा ओपीडीमधील आरोग्य मित्र, तर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, आरोग्यमित्र यांच्याशी संपर्क करावा. ही माहिती घेण्यासाठी नागरिकांनी जाताना शिधापत्रिका, आधार कार्ड, फोटो सोबत न्यावा. 


३०० आजारांवर उपचार 
आयुष्यमान भारत ही योजना महात्मा फुले जीवनदायी योजनेप्रमाणे आहे. परंतु वैद्यकीय खर्चाची मर्यादा दीडवरून ५ लाख रुपये केली अाहे. १३०० आजार कव्हर केले आहे. या योजनेचा नक्कीच रुग्णांना लाभ होणार आहे. डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता 

 

 

बातम्या आणखी आहेत...