आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ नन रेप: मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू, फादरच्या भावाने केला हत्येचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - बहुचर्चित केरल नन रेप केसमध्ये अडकलेल्या बिशप फ्रँको मुलक्कलविरुद्ध साक्ष देणारे फादर कुरियाकोसे कट्टूथारा यांचा सोमवारी सकाळी संशयास्पद अवस्थेत आढळला. 60 वर्षीय कुरियाकोसे आज सकाळी जालंधरच्या भोगपूर परिसरात मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. दुसरीकडे, फादर कुरियाकोसे यांच्या भावाने सुनियोजित कट रचून हत्या केल्याचा आरोप केला आहे.

 

याप्रकरणी चौकशी करत असलेले डीएसपी एआर शर्मा म्हणाले की, फादरच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नाहीत. फादरने उलटी केली होती. घटनास्थळी ब्लड प्रेशरची टॅब्लेट सापडली होती. त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली नव्हती. सध्या चौकशी सुरू आहे.

 

केरळ नन रेप प्रकरणात अडकलेल्या फ्रँको मुलक्कलला मोठ्या दबावानंतर राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्याविरुद्ध कुरियाकोसेने जबाब नोंदवला होता.

 

कुरियाकोसे यांचे भाऊ जोस कट्टूथारा यांनी हत्येचा आरोप केला आहे. आजपर्यंतच्या चौकशीत ते म्हणाले की, त्यांच्या भावाची सुनियोजित हत्या करण्यात आली आहे. त्यांना मागच्या काही काळापासून धमक्या मिळत होत्या. भावाचा मृतदेह आढळल्याचे कळताच ते अलप्पेसाठी रवाना झाले आहेत. ते म्हणाले की, अलप्पेला पोहोचून याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहे. यानंतर ते जालंधरला जाऊन तेथेही तक्रार दाखल करतील.

 

केरळच्या ननने बिशप फ्रँको मुलक्कलवर 2014 ते 2016 दरम्यान सतत रेप केल्याचा आरोप केला आहे. बिशपला याप्रकरणी मोठ्या दबावानंतर सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. तथापि, नंतर त्यांनी केरळ हायकोर्टातून जामीन मिळाला होता. याप्रकरणी जालंधरच्या एका चर्चने आरोपी बिशपला पूर्णपणे क्लीन चिट दिली होती. जालंधरच्या मिशनरीज ऑफ जीससने एका अंतर्गत रिपोर्टमध्ये म्हटले होते की, बिशप याप्रकरणी निर्दोष आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...