आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्स नरूलाने जिंकला चौथा रिअॅलिटी शो, पत्नी युविका चौधरीसोबत ठरला'नच बलिए 9'चा विनर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः अभिनेता प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी अभिनेत्री युविका चौधरी 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनचे विजेते ठरले आहेत. रविवारी या शोचा ग्रॅण्ड फिनाले रंगला. या शोचे विजेते ठरल्यानंतर एका मुलाखतीत प्रिन्स गमतीने म्हणाला की, आता इतर रिअॅलिटी शोजमध्ये कदाचित त्याला बोलावले जाणार नाही.  'नच बलिए'पूर्वी प्रिन्स 'रोडीज' (2015), 'बिग बॉस 9' आणि 'स्प्लिट्सविला 8' चा विनर राहिला आहे.

विजेता ठरल्यानंतर प्रिन्स म्हणाला...
प्रिन्स गमतीशीर अंदाजात म्हणाला,"यापुढे आता आणखी कुठल्या रिअॅलिटी शोमध्ये मला बोलावे जाईल, असे वाटत नाही." युविका म्हणाली, "अशाप्रकारचे शो आमच्यासारखा आउटसाइडर्सना पुढे पाऊल टाकण्यास मदत करतात. वैयक्तिक आणि व्यवसाायाच्या दृष्टीने आमच्यासाठी हा शो भाग्यभाली ठरला." प्रिन्स आणि युविका यांचे 'बिग बॉस 9' (2016) या शोमध्ये सूत जुळले आणि दोघांनी 2018 मध्ये लग्न थाटले.

या होत्या टॉप 5 जोड्या.. 
सीझनच्या टॉप 5 जोड्यांमध्ये प्रिन्स-युविकासह शांतनु-नित्यामी, अनीता-रोहित, विशाल-मधुरिमा आणि अली गोनी-नताशा यांचा सहभाग होता. अनिता हसनंदानी-रोहित रेड्डी आणि विशाल आदित्य सिंह-मधुरिमा तुली क्रमशः फर्स्ट आणि सेकंड रनरअप ठरले. ग्रॅण्ड फिलानेला झीनत अमान,  कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, अनिल कपूर आणि गोविंदा यांची प्रमुख हजेरी होती.

सलमान खान होता शोचा निर्माता... 
अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता होता आणि याची प्राइज मनी 50 लाख रुपये होती. रवीना टंडन आणि अमजद खान या शोचे जज होता. तर मनीष पॉल आणि वालुस्चा डिसूजा  यांनी हा शो होस्ट केला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...