आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्स नरुला म्हणाला -"नच बलिए 9' मधून जिंकलेल्या पैशातून काही पैसा गरजू मुलांसाठी खर्च करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरण जैन -  'नच बलिये' या डान्स शोची ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत अनेक लोकप्रिय टीव्ही सेलिब्रिटी होते. अखेर ही ट्रॉफी अभिनेता प्रिन्स नरुला आणि त्याची जोडीदार युविकाने पटकावली. या मुलाखतीत अभिनेता प्रिन्सने जिंकलेल्या पैशाचे काय करणार आणि भविष्याचे नियोजन यावर आमच्याशी चर्चा केली...

  • 13 ते 14 तास सराव करत हाेताे...

माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टी खास राहिल्या आहेत, परंतु नच बलियेचा विजय माझ्यासाठी खूप खास आहे कारण या विजयामध्ये युविका माझ्यासोबत आहे. नृत्याच्या या प्रवासात आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली. अाम्हाला चांगला डान्स जमत नव्हता असे लाेक म्हणत. त्यामुळे यावर मात करत अाम्ही चांगले नर्तक म्हणून यातून बाहेर पडलाे अाहाेत. या विजयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही 13 ते  14 तास सराव करायचो, थोडे झोपण्यासाठी घरी जायचाे आणि मग पुन्हा आमच्या तालमीला लागायचाे. खरं सांगायचं तर ... आम्ही विजयापेक्षा समाधानासाठी यात गेलाे हाेताे, यातून अाम्हाला भरपूर आनंद मिळाला. आम्ही नाचण्याचाही आनंद घेतला. जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा खूप आनंद झाला. इतक्या काळात बऱ्याच आठवणी तयार झाल्या. शोशी संबंधित प्रत्येकजण खूपच खास होता आणि तो नेहमीच संस्मरणीय राहतील.

  • एकमेकांसोबत परफेक्ट असणे गरजेचे आहे...

शोमध्ये प्रेक्षकांमुळेदेखील काही वाद उद्भवले हाेते, ही गाेष्ट मी नाकारणार नाही. कधीकधी वाटायचे की, वाद इतका वाढवण्याची गरज नव्हती. प्रत्येकाची स्वतःची विचारसरणी आहे. माझ्या मते, आपले वैयक्तिक जीवन शेअर करणे आवश्यक नाही, ते थोडेसे प्रोफेशनल असले पाहिजे. प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण मला आणि युविकाला याचा काही फरक पडला नाही. आम्हाला फक्त आमच्या नृत्यावर लक्ष केंद्रित करायचे होते. आमच्या दोघांनाही खात्री होती की, की विजय आमचाचा होईल. जिंकलेल्या पैशातून मी काही पैसा गरजु मुलांवर खर्च करणार आहे.

  • हा प्रवास आम्ही एकत्र अनुभवला

या शोच्या माध्यमातून मी आणि युविका एकमेकांना अधिक चंागल्या प्रकारे ओळखू शकलो. आम्ही 13  ते 14 तास एकत्र घालवत होतो, यामुळे एकमेकांना समजून घेतले. आता व्यक्तिशः आणि व्यावसायिकदृष्ट्या आम्ही खूप सक्षम झालो आहोत आणि त्याच प्रकारे हा प्रवासही सशक्त होता. आम्ही हा प्रवास एकत्र जगलो. (हसत) मला संधी मिळाली तर मला रिअॅलिटी शो करायला आवडेल. तथापि, मला वाटत नाही की दुसरा कोणताही रिअॅलिटी शो माझ्याकडे येईल (हसत).

  • शंतनू चांगला डान्सर आहे, मात्र आम्हीदेखील खूप मेहनत घेतली...

शंतनू माहेश्वरी खूपच चांगला डान्स आहे. तो आमचा स्पर्धक होता. त्याने आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. एक जोडपे म्हणून, आम्हाला लोकांकडून खूप प्रेम मिळाले आहे, बऱ्याचजणांचे आम्ही आयकॉन बनलो आहोत. कदाचित हा डान्स थोडा वरचढ झाला असेल. शंतनू एक चांगला डान्सर आहे, ही गोष्ट मला मान्य आहे मात्र आम्हीदेखील दिवसरात्र परिश्रम घेतले.

  • हा विजयाचा क्षण आम्ही काही दिवस आणखी जगू पाहत आहोत

शोमधून मिळवलेल्या पैशांमधील काही रक्कम मी गरजूसाठी वापरणार आहे. याशिवाय उर्वरित रकमेचा आनंदही आम्ही घेणार आहोत. काही सुट्ट्यांचे नियोजन केले आहे. देश-विदेशात फिरण्याचा बेत आखला आहे. हा विजयाचा क्षण आम्ही काही दिवस तरी अनुभवणार आहोत.