आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिंस नरुलाचा भाऊ रूपेशचे कॅनडामध्ये झाले निधन, तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : प्रिंस नरूलाचा भाऊ रूपेश उर्फ रूबीचे कॅनडामध्ये निधन झाले आहे. तो तिथेच राहायचा. प्रिंसला जेव्हा ही दुःखद बातमी कळाली तेव्हा तो पत्नी युविका चौधरीसोबत डान्सिंग रियलिटी शो 'नच बलिए 9' चे शूटिंग करत आहे. हे ऐकताच तो एकदम कोलमडून पडला. त्याने भरलेल्या डोळ्यांनी सेटवर ऑडियन्सला ही बातमी दिली. त्यानंतर तो आणि युविका रूपेशच्या अंत्यविधींसाठी कॅनडाला रवाना झाले. 

 

सोमवारी झाले होते ​​​​​​​रूपेशचे​​​​​​​ निधन... 
रिपोर्ट्सनुसार, रूपेशचे निधन सोमवारी झाले. तेव्हा तो स्कारबोरो (टोरंटो)च्या ब्लफर्स पार्कमध्ये कॅनडा दिन सेलिब्रेट करत होता. मिळालेल्या माहितीनुसार रूपेश मित्रांसोबत कॅनडा दिन साजरा करत होता. तेव्हाच तो नदीच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून गेला. त्याला पोहता येत नव्हते. रिपोर्ट्सनुसार, 3 महिन्यांपूर्वी रूपेशचे लग्न झाले होते आणि त्याची पत्नी जुलैमध्ये त्याला भेटणार होती.  

 

अनेक रियलिटी शोजचा विनर आहे प्रिंस... 
28 वर्षांचा प्रिंस 'रोडीज एक्स 2', 'स्पिल्ट्स विला 8' आणि 'बिग बॉस 9' यांसारख्या रियलिटी शोजचा विनर म्हणून ओळखला जातो. त्याने फिक्शन शो 'बढ़ो बहू', 'लाल इश्क' आणि 'नागिन 3' मध्येदेखील काम केले आहे. प्रिंस आणि युविकाचा नवा रियलिटी शो 'नच बलिए 9' चे प्रीमियर 20 जुलैपासून सुरु होणार आहे. हा शो सलमान खानने प्रोड्यूस केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...