आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशी प्रिन्स म्हणाले, वाइनवर चालते माझी कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी अापल्या ७० व्या वाढदिवशी एक गाैप्यस्फाेट केला. ते म्हणालेे, ‘५० वर्षे जुनी माझी कार पेट्राेल, डिझेल व गॅसवर नव्हे, तर प्रसिद्ध व्हाइट वाइनवर चालते.’ 


प्रिन्स चार्ल्स हे आलिशान गाड्यांचे शाैकिन अाहेत, तसेच पर्यावरणप्रेमीही. याच उद्देशाने त्यांनी अापल्या एस्टन मार्टिन कारमध्ये बदल करून घेतला अाहे, त्यानुसार ही कार वाइनवर चालते अाणि प्रदूषणही कमी हाेते. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांनी राजघराण्याची शाही रेल्वे राॅयल साेवरिनही इकाे-फ्रेंडली बनवली अाहे. लाेकाेमाेटिव्ह इंजिनिअरच्या मदतीने त्यांनी या रेल्वेचे प्रदूषण घटवण्याचा प्रयत्न केला. या रेल्वेत इंधन म्हणून चक्क स्वयंपाकातून उरलेल्या तेलाचा वापर केला जाताे.

बातम्या आणखी आहेत...