आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाकीण मिळत नसल्याने धाबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाच्या पत्नीने तीन महिने विनामूल्य शिजवला पाेषण आहार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पारोळा : तालुक्यातील धाबे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाेषण आहार शिजवण्यासाठी एका परिवाराने बंद केल्यामुळे गावातील एकही महिला तयार हाेत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाेषण आहार कसा खावू घालावा याची चिंता मुख्याध्यापक मनवंत साळुंखे यांना हाेती. मात्र, त्यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नीने तब्बल ८४ दिवस मेनू चार्टप्रमाणे कुठलाही माेबदला न घेता पाेषण आहार शिजवून गरीब मुलांना खावू घातला. त्यांनी निरपेक्ष व नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. 


धाबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पूर्णपणे आदिवासी भिल्ल वस्तीची आहे. त्यात ५० पटसंख्या आहे. शाळेत शालेय पाेषण आहार शिजवणे सुरू झाले, तेव्हापासून गावातील एक परिवार आहार शिजवण्याचे काम करीत हाेता. मात्र, त्या कुटुंबाने अडचणींमुळे आहार शिजवणे बंद केले. त्यामुळे मुख्याध्यापकांसमाेर माेठे संकट उभे राहिले. मुख्याध्यापक मनवंत साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंत पाटील यांनी प्रत्येकाच्या घरी जावून आहार शिजवण्यासाठी विनंती केली. मात्र, काेणीही तयार झाले नाही. दिवाळीनंतर ९० टक्के परिवार ऊस ताेडणीसाठी परजिल्ह्यात निघून जाता. 


मुलांना आजी-आजाेबा व नातलगांकडे टाकून जातात. शाळेत एक वेळ चांगले जेवण मिळते. बिस्किट, मिठाई, फळेही शाळेत नियमित मिळतात. बऱ्याचदा सुटीच्या दिवशीही खावू दिला जाताे. याचा विश्वास मुलांच्या पालकांना आहे. त्यामुळे ते मुलांना बिनधास्तपणे टाकून जातात. 


तब्बल ८४ दिवस सेवा; बाहेरगावी जाणेही टाळले 
चित्रा पाटील ह्या आदल्या दिवशी भाजीपाला आणणे, धान्य निवडणे, उसळ भिजत टाकणे, पहाटे ५ वाजताच उठून भाजीभात, वरण भात तयार करीत असे. थंड झाल्यावर ते एका मोठया डब्यात व्यवस्थित एकत्र करणे. तसेच पतीचाही जेवणाचा डबा तयार करणे. असा रोजचा उद्याेग सुरु झाला. २० नोव्हेंबर २०१८ पासून सुरू झालेली ही सेवा ३१ जानेवारी २०१९ अखेर सुटी वगळता तब्बल ८४ दिवस चालली. बाहेरगावीदेखील जाता आले नाही. 


१ फेब्रुवारीपासून स्वयंपाकी बाई उपलब्ध 
स्वयंपाकी बाईची १ फेब्रुवारीपासून व्यवस्था झाली. त्यांनी शालेय पोषण आहार शिजविणे सुरु केले. चित्रा पाटील यांनी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता निस्वार्थ सेवा दिली. या अगोदरही मुलींना पायातील साखळ्या, बिंदी पाकिट, किशोरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप, स्लॅक वाटप, दिवाळीला फराळ, मिठाई वाटप, मुलांच्या गणवेशाची शिलाई बारा हजार रुपये, शिलाई मशिन, बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमात सहभाग अशा प्रकारची सेवा दिली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...