आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे शिक्षक असतील तर काय होणार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे; आशीर्वाद लिहिता येत नसेल तर तो देणार कसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानगड - राजस्थानातील हनुमानगड येथील एका सरकारी शाळेत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभातीलाल जाट यांनी अचानक भेट दिली. त्यांनी शाळेची पाहणी करत मिड-डे मील योजनेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थ आणि साहित्याची गुणवत्ता तपासली. यादरम्यान ते 8 वीच्या वर्गात शिरले. त्यांनी अभ्यासाचा दर्जा तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना फळ्यावर आशीर्वाद हा शब्द लिहिण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी हा शब्द 'आर्शिवाद' असा लिहिला. तर मुख्याध्यापिकांनी त्यांच्या दोन पावले पुढे जात हा शब्द 'आर्शीवाद' असा लिहिला. 


फक्त एका विद्यार्थिनीला लिहिता आले 
मुख्याध्यापिका वीणा दुआ यांच्या या चुकीमुळे जिल्हाधिकारी चांगलेच नाराज झाले. त्यांनी मुख्याध्यापिकांना रागावले. ते म्हणाले, तुम्ही मुख्याध्यापिका आहात, शाळेत सर्वात मोठ्या पदावर आहात. तुमचीच ही स्थिती असेल तर मुलांचे भवितव्य कसे घडणार. मुख्याध्यापिकांना इशारा देत ते म्हणाले, भविष्यात पुन्हा अशी चूक होता कामा नये. 

बातम्या आणखी आहेत...