आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या आत लपून बसलेली व्यक्ती निघाली आरोपी, अशाप्रकारे पोलिसांना लागला सुगावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्कः कानून के हाथ लंबे होते है... हे आपण कायम ऐकत आलो आहोत. पण हा व्हिडिओ बघून याची प्रचितीसुद्धा येते. हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच विचारात पडला... कारण एक इसम जमिनीच्या आत फसला आहे आणि कुणी त्याला बाहेर काढण्याचा आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्नदेखील करत नाहीये. पण असे का? आणि हा इसम जमिनीच्या एवढ्या खोल शिरलाच कसा? 


पण ही कहाणी जरा उलटी आहे. कारण या व्यक्तीला कुणी जमिनीच्या आत गाडलेले नाही आणि त्या ठिकाणी एखादी दुर्घटनाही घडलेली नाही. झाले असे की, जमिनीत फसलेली हा इसम तुरुंगातून पळालेला एक आरोपी आहे आणि पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने स्वतःचा एक खड्डा खणला आणि त्यात जाऊन लपला. पण या आरोपीचे नशीब एवढे खराब होते की, एका रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तो खड्डा आणखी खोल होत गेला आणि हा आरोपी त्यात असा काही अडकला की, त्याला बाहेर पडणे अशक्य झाले. त्याने खणलेला खड्डा एवढा खोल गेला की, तो त्यात दिसतही नव्हता फक्त त्याचा आवाज ऐकू येत होता. 


तुरुंगातून पळ काढल्याच्या दुस-या दिवशी जेव्हा पोलिस त्याचा शोध घेत होते, तेव्हा आरोपीने स्वतः जोरजोरात हाक मारुन पोलिसांना खड्ड्याकडे बोलावले आणि त्याला बाहेर काढण्याची विनंती केली. अशा प्रकारे आरोपी पुन्हा पोलिसांना गवसला आणि पोलिस पुन्हा त्याला तुरुंगात घेऊन गेले. 

बातम्या आणखी आहेत...