Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | prisoner's suicide in jail

जामीन होत नसल्याने कैद्याची गळफास घेऊन तुरुंगातच अात्महत्या

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 06:42 AM IST

उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील एका कैद्याने पत्र्याच्या आडूला टी शर्ट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • prisoner's suicide in jail

    उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील एका कैद्याने पत्र्याच्या आडूला टी शर्ट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (दि. ५) सकाळी ७.२५ वाजता घडला. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.


    योगेश ऊर्फ रुद्र शिवाजी शिंपले (१८, रा. कळंब) याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्यानुसार कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अालेली अाहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून ताे कारागृहात हाेता. मात्र जामीन होत नसल्यामुळे तसेच प्रेमप्रकरणात वैफल्य वाढल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्याने लिहून ठेवली हाेती.

Trending